Tuesday, March 26, 2024

कृपया सुधारीत वृत्त

कृपया सुधारीत वृत्त क्र. 274

 

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या

प्रथम प्रशिक्षणाचे 29 मार्च रोजी आयोजन

 

नांदेडदि. 26 :-. 16 नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या  अनुषंगाने 87-नांदेड दक्षिण विभानसभा मतदारसंघाचे प्रथम प्रशिक्षण शुक्रवार 29 मार्च 2024 रोजी सचखंड पब्लीक स्कुलश्री गुरू ग्रंथ साहिब भवन हिंगोली गेट ओव्हर ब्रिजच्या बाजूला नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दोन सत्रात होणार असून प्रथम सत्र सकाळी ते 11 आणि 11 ते दुपारी 1 तसेच द्वितीय सत्र दुपारी ते व ते या कालावधीत संपन्न होणार आहे. या प्रशिक्षणासाठी सर्व एकुण 312 मतदान केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.


यामध्ये मतदान केंद्राध्याक्षमतदान अधिकारी असे एकूण हजार 166 अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण लाख हजार 546 मतदार असून यामध्ये पुरुष मतदार लाख 56 हजार 308, स्त्री मतदार लाख 47 हजार 235 व तृतीयपंथी मतदार असे आहेत. प्रथम प्रशिक्षणामध्ये संपूर्ण पी.पी.टी. च्या माध्यमातून साहित्य हस्तगत करण्यापासून साहित्य परत करण्यापर्यतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्यक्ष मतदान यंत्र कसे हाताळावयाचे याचे प्रशिक्षण तज्ञ मास्टर ट्रेनर तथा क्षेत्रिय अधिकारी यांचे मार्फत दिले जाणार आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही मतदान प्रक्रिया पूर्ण कळाली आणि प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळल्या बाबतचे प्रमाणपत्र क्षेत्रिय अधिकारी यांना दिल्याशिवाय प्रशिक्षण पूर्ण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, 16-लोकसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी विकास माने व प्रशिक्षण विभाग प्रमुख तथा नायब तहसिलदार नितेश कुमार बोलोलू यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...