Tuesday, December 20, 2022

 माळेगाव यात्रेत बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 20 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) तसेच केंद्र  सरकारच्या वर्ष सेवासुशासन आणि गरीब कल्याण सेवा या विषयांवर अधारीत भव्य बहूमाध्यम प्रदर्शानाचे आयोजन लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी  दुपारी 2.00 वा. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास, पंचायत राज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.

 

हे प्रदर्शन दिनांक 22 ते 26 डिसेंबर 2022 कालावधी सकाळी ते रात्री वाजेपर्यत सर्वांसाठी विनामुल्य खूले राहणार आहे.  या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो नांदेडच्यावतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडीबहुमाध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात 1857 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडी आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा छायाचित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात येणार आहे.

 

केंद्र सरकारच्या वर्ष सेवासुशासन व गरीब कल्याण सेवा निमित्त सरकारने राबविलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती  या बहूमाध्यम प्रदर्शानातून दर्शवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरखासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदेजिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदींची उपस्थिती राहणार आहे. या बहुमाध्यम  प्रदर्शनास  भाविकांनी  भेट द्यावीअसे आवाहन नांदेड येथील केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभायेसहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...