वृत्त क्रमांक
फेब्रुवारी-मार्च 2027 मधील दहावी परीक्षेचे अर्ज सादर करण्याबाबत सूचना
नांदेड दि. 20 ऑगस्ट :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) फेब्रुवारी-मार्च 2027 परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.
तसेच पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील पुढीलप्रमाणे आहे.
नियमित शुल्क प्रकारात माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांचे अर्ज भरावयाची मुदत बुधवार 19 ऑगस्ट ते शनिवार 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत तर माध्यमिक शाळांनी विहित पद्धतीने शुल्क भरावयाच्या मुदत सोमवार 31 ऑगस्ट ते शनिवार 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे.
विलंब शुल्क रविवार 1 नोव्हेंबर 2026 ते रविवार 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत तर माध्यमिक शाळांनी विहित पद्धतीने शुल्क भरावण्यासाठी रविवार 1 ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदत राहील.
अतिविलंब शुल्क सोमवार 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 आहे. प्रति विद्यार्थी प्रती दिन रु. 50 प्रमाणे सोमवार 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत माध्यमिक शाळांनी विहित पद्धतीने शुल्क भरावयाची आहे.
माध्यमिक शाळांनी शुल्क पावती, विद्यार्थ्यांच्या प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची मुदत सोमवार 7 डिसेंबर 2026 पर्यंत राहील.
सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची अर्ज भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिन मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत अर्जात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इ. 10 वी परीक्षेची
आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांची
आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील
मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील महत्त्वाच्या बाबी विचारात
घेणे आवश्यक आहे.
माध्यमिक शाळांना नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. UDISE + मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्रे सादर करता येईल.
पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थी यांची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.
कौशल्य सेतू अभियानाचे Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन विषया समोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पध्दतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी विभागीय मंडळात जमा करावी.
ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी. सर्व माध्यमिक शाळांनी वेबसाईटद्वारे ठराविक संख्येने विद्यार्थ्यांची निवड करून एकत्रित रक्कमेचा एसबीआय बँकेच्या ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे अचूक रक्कमेचा भरणा करावा व चलनाची प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावी. रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्याच्या application status मध्ये Draft चा Send to Board व Payment status मध्ये Not Paid चा Paid असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी. अशा Send to Board व "Paid" Status प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल व उर्वरित आवेदनपत्रे Draft Mode मध्येच राहतील व त्याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही. यापूर्वी वापरात असणाऱ्या बँकाच्या जुन्या चलनाचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही.
अर्जातील फोटोच्या सविस्तर सूचना
परीक्षेसाठी फोटो अपलोड करताना व्यावसायिकरित्या काढलेला रंगीत पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. फाईलचे स्वरूप JPG असावे आणि आकार 25 KB ते 40 KB च्या दरम्यान असावा (जास्तीत जास्त 40 KB पर्यंत), फोटो गेल्या 6 महिन्यांत काढलेला असावा.
छायाचित्रासाठी महत्त्वाचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे
स्वरूप आणि गुणवत्ता: फोटो हाय-क्वालिटी आणि स्पष्ट रंगाचा असावा. फोटोचा पार्श्वभाग (Background) पांढरा किंवा साध्या रंगाचा असावा. विद्यार्थ्यांचे स्वरूप : विद्यार्थ्यांचा चेहरा स्पष्ट आणि समोर असावा. दोन्ही डोळे आणि कान उघडे असावेत. चेहरा पूर्णपणे दिसत असावा (चेहऱ्यावर केस किंवा मास्क नसावा). विद्यार्थ्याने शक्यतो अधिकृत शालेय गणवेश घातलेला असावा. जर विद्यार्थी चष्मा लावत असेल, तर डोळ्यांवर प्रकाश पडून फोटो खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
तंत्रज्ञानाची माहिती
फोटो JPEG (.jpg) फॉरमॅटमध्ये सेव्ह केलेला असावा. इतर फॉरमॅट मधील (.PNG, BMP) फाईल .JPG म्हणून RENAME करू नये. फाईलचा आकार 25 KB ते 40 KB दरम्यान असावा.आवेदनपत्रे मंडळाकडे पाठविल्यानंतर व प्रवेशपत्रे तयार झाल्यानंतर कोणताही फोटो बदलता येणार नाही.
आवेदनपत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या नावात, जन्मतारखेमध्ये असंख्य त्रुटी आढळतात. त्यामुळे Prelist
वर अथवा आवेदनपत्राच्या Print out वर
विद्यार्थ्यांची, पालकांची स्वाक्षरी घ्यावी. आवेदनपत्रातील
चुका टाळण्यासाठी माध्यमिक शाळांनी अनेक दुय्यम लॉगिन, शाळेच्या
मेन लॉगिनमध्ये तयार करून कॉम्युटर लॅबमध्ये विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रे भरून
मुख्य लॉगिनद्वारे त्याची तपासणी करावी. माध्यमिक शाळांनी सादर केलेली सर्व
आवेदनपत्राचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध
करून दिली जाणार नाहीत. आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात
येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी, असे
आवाहन लातूर विभागीय मंडळ विभागीय सचिव अनुपत्र भंडारी यांनी केले आहे.
**********
No comments:
Post a Comment