Sunday, March 1, 2026

वृत्त क्रमांक  

महत्त्वाची सूचना 

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड, दि. १ मार्च :- मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.

या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

आपत्कालीन संपर्क तपशील

रामल्लाह  (पॅलेस्टाईन)

फोन : +970592916418

ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

दोहा (कतार)

फोन : 00974-55647502

ईमेल : cons.doha@mea.gov.in

रियाध (सौदी अरेबिया)

फोन : 00-966-11-4884697

WhatsApp : 00-966-542126748

टोल फ्री : 800 247 1234

ईमेल : cw.riyadh@mea.gov.in

तेल अवीव (इस्रायल)

फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378

ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in

तेहरान (इराण)

फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)

टोल फ्री : 800-46342

WhatsApp : +971543090571

ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in

कुवैत 

फोन : +96565501946

ईमेल : community.kuwait@mea.gov.in

बाहरीन

फोन : 00973-39418071

मस्कत

टोल फ्री : 80071234

WhatsApp : +96898282270

ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन

फोन : 00962-770 422 276

बगदाद (इराक) 

फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899 

वेबसाइट :eoibaghdad.gov.in

ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

https://x.com/i/status/2027746402575782262

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आवश्यक सूचना

1. सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी

2. भारतीय दूतावास/कॉन्स्युलेटच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे

3. आपले लोकेशन व स्थिती कुटुंबीयांना सतत कळवावी

4. मोबाईल चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत

5. सोशल मीडियावर अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये

6. दूतावासाकडे नोंदणी (Registration) करणे अत्यावश्यक

महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे MEA एकत्रितपणे परदेशातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर २४०७ लक्ष ठेवून आहेत. नागरिकांचे संरक्षण, माहिती समन्वय, आवश्यक ती मदत आणि परिस्थितीनुसार स्थलांतरण/evacuation यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, याबाबत जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत.

तरी कतार, संयुक्त अरब अमिरात, बहरीन या देशांमध्ये नांदेड जिल्ह्यातील नागरिक अडकून पडलेले असल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथील हेल्पलाईन (02462)235077 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक     दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या   खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवल तीचे गुण  प्रस्ताव ऑनलाईन सादर   करण्याचे आव...