Wednesday, August 24, 2022

 नांदेड जिल्ह्यात 12 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 195 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 9 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 12 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 396 एवढी झाली असून यातील 1 लाख 679  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 3  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 5 असे एकूण 8 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 16,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 9 असे एकूण 25 व्यक्ती उपचार घेत आहेत 

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 16 हजार 348
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 95 हजार 537
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 396
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 679
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-
 05
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 

No comments:

Post a Comment

 यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात आज माळेगावच्या यात्रेला प्रारंभ   आज देवस्वारी व पालखी पूजन  नांदेड दि. २८ डिसेंबर : उद्या 29 डिसेंबर रोजी...