Monday, March 8, 2021

नांदेड जिल्ह्यात 208 व्यक्ती कोरोना बाधित तर  

1 हजार 84 अहवालापैकी 845 निगेटिव्ह

नांदेड (जिमाका) दि. 8 :- सोमवार 8 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 208 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 95 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 113 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 104  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 1 हजार 84अहवालापैकी 845 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 746 एवढी झाली असून यातील 22 हजार 922 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 3 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 23 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 606 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 64, देगलूर कोविड रुग्णालय 2,  मुखेड कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, माहूर तालुक्याअंतर्गत 12, खाजगी रुग्णालय 17, किनवट कोविड रुग्णालय 4 असे एकूण 104 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.62 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 83,  अर्धापूर तालुक्यात 1, धर्माबाद 1, कंधार 3, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 1, हदगाव 2, परभणी 1, यवतमाळ 1 असे एकूण 95 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 99, देगलूर तालुक्यात 2, कंधार 1, किनवट 2, नांदेड ग्रामीण 3, हदगाव 3, मुखेड 2, परभणी 1 असे एकूण 113 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 3 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 54, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 71, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 64, किनवट कोविड रुग्णालयात 35, मुखेड कोविड रुग्णालय 9, हदगाव कोविड रुग्णालय 8, महसूल कोविड केअर सेंटर 68, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 418, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 172, खाजगी रुग्णालय 100 आहेत. 

सोमवार 8 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 134, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 41 हजार 280

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 12 हजार 150

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 746

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 922

एकुण मृत्यू संख्या-606

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 92.62 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-29

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-211

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 3

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-23.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...