Wednesday, August 19, 2026

वृत्त क्रमांक 

माहूरमध्ये आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी #इमारत भाडेतत्त्वावर हवी

नांदेड दि. 19 ऑगस्ट : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या अधिनस्त असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृह माहूरसाठी इमारत भाडेतत्त्वावर घेणे आवश्यक आहे.
75 प्रवेश क्षमतेच्या या वसतिगृहासाठी #माहूर शहरात सर्व सोयी-सुविधांनी युक्त, 20 ते 25 खोल्या असलेली तसेच बारमाही पाणी उपलब्ध असलेली इमारत आवश्यक आहे. इच्छुक इमारत मालकांनी आपली इमारत उपलब्ध असल्यास गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय #वसतिगृह, माहूर (रेणुका भक्त निवासच्या पाठीमागे) यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 7038649239 वर संपर्क साधावा, असे आवाहन आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह माहूर जिल्हा #नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   माहूरमध्ये आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी #इमारत भाडेतत्त्वावर हवी नांदेड दि. 19 ऑगस्ट : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्...