वृत्त क्रमांक
धर्माबाद तालुक्यातील सालेगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून एसआयआर कामाची पाहणी
नांदेड, दि. ४ जुलै : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत मतदारांचे गणना पत्रक भरून घेण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज धर्माबाद तालुक्यातील मौजे सालेगाव येथे भेट देऊन विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गावात सुरू असलेल्या मतदार गणना पत्रक भरण्याच्या प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करून कामकाजाची माहिती घेतली.
तसेच बीएलओंकडून सुरू असलेल्या सर्वेक्षण व गणना पत्रक भरण्याच्या कामाची गुणवत्ता, अचूकता आणि गती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.
000000
No comments:
Post a Comment