वृत्त क्रमांक 344
अथलेटिक्स, कुस्ती खेळासाठी खेळाडूंची निवड
पात्र खेळाडुंना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 18 मार्च :- राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मिशन लक्षवेध हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला असून या योजनेंतर्गत लातूर विभागास अथलेटिक्स व कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरु करण्यास मान्यता मिळालेली आहे. या विभागीय क्रीडा निपुणता केंद्र अंतर्गत अथलेटिक्स व कुस्ती या खेळांच्या प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यासाठी पात्र खेळाडूंनी आपले अर्ज विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग जिल्हा क्रीडा संकुल परिसर औसा रोड लातूर येथे प्रत्यक्ष अथवा dyd.syslatur@rediffmail.com या मेलवर शुक्रवार 20 मार्च 2026 पर्यंत करावे, असे आवाहन लातूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक महादेव कसगावडे यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे व पात्रता
वयोमर्यादा- 25 वर्षाआतील मुले/मुली (वर्षाच्या 31 डिसेंबर 2026 रोजी).
आवश्यक कागदपत्रे- जन्म दाखला, शाळा
सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील 2 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज 3 फोटोग्राफ, शाळा महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकांचे संमती पत्र इ.
अधिवास- महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असणे आवश्यक (अधिवास
प्रमाणपत्र)
क्रीडा कामगिरी- राज्य स्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय
स्तरावरील सहभागी (SGFI, AFI, Khelo India National only) गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे
मूल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती चाचन्यांमध्ये पात्र होणे
आवश्यक.
वैद्यकीय तपासणी-शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.
निवड झालेल्या खेळाडूना निवासी क्रीडा प्रशिक्षण, पायाभूत सुविधा व क्रीडा साहित्य, खेळाडूंचा सराव व मुल्यांकनाकरिता क्रीडा स्पर्धेचे आयोजन स्पोर्ट्स सायन्स सेंटर, करीयर मार्गदर्शन, देशी-विदेशी संस्थांच्या सहकार्याने क्षमता विकास कार्यक्रम इ. सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मिशन लक्षवेध ही निवासी विभागीय क्रीडा निपुणता योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तसेच यामध्ये निवड झालेल्या खेळाडूना निवास, भोजन, पूरक आहार, खर्च, क्रीडा प्रशिक्षण साहित्य, निवडलेल्या खेळाडूंचे देशांतर्गत / परदेशी प्रशिक्षण व देशांतर्गत / विदेशातील स्पर्धा सहभाग खर्च, खेळाडूंच्या वैद्यकीय चाचण्या, किरकोळ वैद्यकीय खर्च, क्रीडा व युवक सेवा लातूर यांच्या मार्फत करण्यात येईल.
मिशन लक्षवेध या योजनेअंतर्गत प्रवेशासाठी जास्तीत जास्त
खेळाडूंनी अर्ज करावा व अधिक माहितीसाठी विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही आवाहन महादेव कसगावडे, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग
लातूर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment