Friday, April 3, 2020


मोटार वाहन कायदांतर्गत  
कागदपत्रांची वैधता 30 जूनपर्यंत
नांदेड दि. 3 :- मोटार वाहन कायदा 1988 केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 अंतर्भूत असणाऱ्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 नंतर अथवा 30 जून 2020 पर्यंत संपूष्टात येत आहे अशी कागदपत्रे 30 जून 2020 पर्यंत मानली जाणार आहेत.
देशात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.  अत्यावश्यक वस्तू सेवा यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासनामार्फत सुट देण्यात आली आहे.
मोटार वाहन कायदा 1988 केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 पुढील अंतर्भूत असणारे कागदपत्रांपैकी ज्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 नंतर अथवा 30 जून 2020 पर्यंत संपूष्टात येत आहे, अशी कागदपत्रे 30 जून 2020 पर्यंत वैध मानली जातील. सर्व अंमलबजावणी यंत्रणानी अशी कागदपत्रे 30 जून 2020 पर्यंत वैध असल्याची ग्राह्य रु पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...