Saturday, April 4, 2020


अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या ई-पाससाठी
ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत 
दि. 4 :- लॉकडाऊन कालावधीत आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मालवाहू वाहनांना परवानगी -पास (e-pass) देण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे  (आरटीओ) ऑनलाईन अर्ज पुढील पद्धतीने करावा.

https://transport.maharashta.gov.in साईटला भेट द्या
Apply for e pass goods vehicle select करावे
RTO where to apply ठिकाणी                      mh26(Nanded) सिलेक्ट करावे
वाहन मालक नाव नोंदवावे
वाहन चालक (driver) नाव नोंदवावे
वाहन चालक यांचे वैध licence  क्रमांक नोंदवावा
वैध मोबाईल क्रमांक नोंदवावा (चालक / मालक )  व ई-मेल आय डि  नोंदवावा
वाहन क्रमांक नोंदवावा
वाहनाचे चेसिस क्रमांक शेवटचे 5 आकडे
वाहनाचा प्रकार नोंदवावा
कोणत्या प्रकारचे माल वाहून नेणार आहे ते नोंदवावे (उदा.  Vegetable /grain/groceries )
माल वाहून नेण्यासाठी मार्ग नमुद करावा  (उदा. Nandedते  latur)
ई पास कालावधी  नमूद करावा  *एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा*(दिलेल्या तारखेमधून निवडावा )
Word verification character भरून  आप्लिकेशन सबमिट करावे.
पाससाठी application reference number  generate होईल.

वरील अर्ज (अँप्लिकेशन) क्रमांकानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मान्यता (approval) केल्यानंतर आपल्या वाहनाचा ई-पास मान्य (generate) होईल व तो पीडीएफ स्वरुपात अर्जदाराच्या -मेल आयडीवर पाठवण्यात येईल / किंवा अर्जदारास प्रिंट घेता येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयीन ईमेल mh26@mahatranscom.in वर वाहन चालक / मालक संपर्क करु शकता, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...