Thursday, October 2, 2025
Wednesday, October 1, 2025
वृत्त क्रमांक 1045
बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड दि. 1 ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रु-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेत 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नियमित विद्यार्थ्यांची अर्ज UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत भगवयाची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी सर्व शाखाचे पुनर्परिक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय. आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची अर्ज त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून भरावयाच्या तारखांना पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे.
शुल्क प्रकारात उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocatioanl Stream) शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच ITI ( औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची अर्ज भरावयाच्या तारखा बुधवार 1 ऑक्टोबर ते
सोमवार 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्याल यांनी 8 सप्टेंबर 2025 ते उपरोक्त नमूद कालावधीत नियमित शुल्काने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणा करावे. शुल्क जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या Application Status मध्ये "Draft" चा "Send to Board" व Payment Status मध्ये "Not Paid चा "Paid" असा बदल झाला आहे का याची खातरजमा करावी.
शुल्क जमा केलेली आरटीजीएस/एनईएफटीद्वारे पावती/चलनासह विद्यार्थ्याच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व उच्च माध्यमिक शाळाप्रमुख, प्राचार्य यांनी नोंद घ्यावी. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाईलमध्ये कॉलेज, संस्था मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे.
सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन मधून प्रिलिस्ट उपलब्ध करून दिलेला असेल. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख, प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
बारावी परीक्षेची अर्ज ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना नियमित विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्र UDISE + मधील PEN-ID वरुन भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. DISE + मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्रे सादर करता येईल. पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी. आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी), व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) विद्यार्थ्याची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्याची अर्ज प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पद्धतीने भगवयाची आहेत. ज्या विद्यार्थ्याचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0000
कृपया सुधारीत वृत्त घ्यावे, ही विनंती.
वृत्त क्रमांक 1044
प्रत्येक पीक कापणी प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावा - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड दि. 1 ऑक्टोबर : पीक कापणी प्रयोगाच्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. मंगळवार 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी कृषी, महसूल व ग्राम विकास (जिल्हा परिषद) विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. खरीप हंगाम सन २०२५-२६ साठी सर्व संबंधीतांना पीक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.
यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगांना आधारभूत धरण्यात येणार आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोगात कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. पीक कापणी प्लॉटची आखणी, कापूस पिकांबाबत आवश्यक वेचनी, भात, सोयाबीन, ज्वार, तूर इत्यादींबाबत सुकविण्याचे प्रयोग,उत्पादन मोजणी तंत्र तसेच प्रयोगाची आवश्यक छायाचित्रे, नोंदी संकलित कराव्यात. सर्व प्रयोग शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसारच पार पडतील याबाबत सर्व संबंधीतांनी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पीक विम्यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्यन्य साधारण महत्व असल्याने सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या गावातील सर्व प्रयोग सीसीई ॲपवर अचूकपणे पार नोंदवले जातील यासाठी आवश्यक दक्षता घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
जिल्हयात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, ज्वार , तूर पिकांचे कापणी प्रयोग शिल्लक आहेत.जिल्हयाभरात ५५८ गावांत एकूण ३३१२ कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामस्तरीय समिती, क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्याच गावातील प्रगतीशील शेतकरी, पोलिस पाटील व ग्रामपंचायत निर्देशीत सदस्य यांनी देखील अचूक निष्कर्ष नोंदवले जातील यासाठी नियोजीत कापणी प्रयोगास वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
याबैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तप्रसाद कळसाईत, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर,तहसिलदार विपीन पाटील, तंत्र अधिकारी गोविंद देशमूख, सुप्रिया वायवळ यांचेसह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
00000
वृत्त क्रमांक 1043
गोदावरी नदीच्या संभाव्य पूर परिस्थितीबाबत
नांदेड पाटबंधारे मंडळाचे नागरिकांना आवाहन
नांदेड दि. 1 ऑक्टोंबर : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ऑक्टोबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तविली आहे. गोदावरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा सध्याचा वेग लक्षात घेता सदरचा विसर्ग शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पस्थळी 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेनंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पस्थळी 3.50 लक्ष ते 4.00 लक्ष क्सुसेक्स विसर्ग नदीपात्रात वाहणार आहे. सदर विसर्ग 24 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ राहण्याची शक्यता आहे. नांदेड शहरात गोदावरी नदीची इशारा पातळी 351 मीटर व धोका पातळी 354 मीटर आहे. सदरील विसर्गामुळे धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने नागरीकांनी संभाव्य उपाययोजना कराव्यात व तशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अ. आ. दाभाडे यांनी केले आहे.
आज 1 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वा. शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामधून 2:00 लक्ष क्युसेक्स इतका विसर्ग चालू आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वा. जायकवाडी धरणातून 3.00 लक्ष क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आले आहे. जायकवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग चालू आहे. शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचे 17 दरवाजे 28 सप्टेंबर 2025 पासून पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. धरणात येणारी आजची आवक सरासरी 2.00 लक्ष क्युसेक्स असून त्यात आज दुपारी 1 वाजेपासून वाढ होण्यास सुरवात झाली आहे.
पावसाच्या परिस्थितीत काही बदल झाल्यास, प्रकल्पस्थळी येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेवून हा विसर्ग कमी अथवा जास्त होण्याची शक्यता आहे. काही समाजमाध्यमाद्वारे नागरिकांमध्ये विसर्गाबाबत चुकीची अथवा अवास्तव माहिती पसरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वस्तुनिष्ठ माहितीसाठी पूर नियंत्रण कक्ष, सिंचन भवन, नांदेड दुरध्वनी क्र. 02462-263870 या क्रमांवर संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 1042
सेवा पंधरवड्यानिमित्त नांदेड येथे भटक्या विमुक्तांना विविध दाखले वाटप
नांदेड दि.१ ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत 'सेवा पंधरवाडा' निमित्त नांदेड आणि अर्धापूर तालुक्यातील भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि नांदेड तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे आयोजन उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत उपविभागीय कार्यालय, नांदेड आणि तहसील कार्यालय, नांदेड यांच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करून त्यांना आवश्यक असलेले विविध दाखले देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात भटक्या विमुक्त जातीचे नेते देविदास हादवे यांनी समाजाच्या विविध समस्या आणि अडचणी मांडल्या. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, रहिवासी दाखला आणि इतर आवश्यक दाखले वाटप करण्यात आले. यामध्ये वासुदेव, मसणजोगी, मुस्लिम मदारी, गाडी वडार, वाघे, गोसावी आणि गोंधळी समाजातील जवळपास १५० नागरिकांची उपस्थितीत होती.
यावेळी, समाजातील वंचित घटकांसाठी 'सेतू' मार्फत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नांदेड शहरातील सेतू केंद्र चालक विजय जोंधळे आणि अर्धापूरचे शिवप्रसाद पत्रे यांचा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.वाडी तांड्यावरील व वस्तीबाहेर राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातीना शासनाच्या विविध योजना लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला परभणीचे जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पांचगे, नायब तहसीलदार संजय नागमवाड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
०००००
पैनगंगा प्रकल्पातील पाणी उपशावर प्रशासनाचे कडक नियंत्रण अवैध मोटार पंप व विद्युत जोडण्या जप्त करण्याचे नांदेड-यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचे निर्...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित जलसाठ्यातून सिंचनासाठी पाणी उपसा करू नये नांदेड पाटबंधारे विभागाचे परवानाधारक शेतकऱ्यांना आवाह...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...



