Saturday, September 26, 2026

वृत्त क्रमांक  

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती व टंचाईग्रस्‍त भागाचा पाहणी दौरा

नांदेड​ (जिमाका) दि. 26 :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे रविवार, दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी दुष्काळसदृश परिस्थिती व टंचाईग्रस्त भागाची पाहणी व समीक्षा करण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत अ​सून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार, दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 6 वा. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 9.30 वा. नांदेड जिल्ह्यात आगमन व जिल्ह्यातील हदगाव, भोकर, उमरी, नायगाव व नांदेड या तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती व टंचाईग्रस्त भागाची पाहणी व समीक्षा दौरा करतील. सोईनुसार नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती व टंचाईग्रस्‍त भागाचा पाहणी दौरा नांदेड ​ (जिमाका) दि. 2...