Friday, May 22, 2026

 वृत्त क्रमांक 

२५ वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता १.५ कि.मी.पर्यंत खुला

नांदेड, दि. 22 मे : नांदेड तालुक्यातील सुगाव बुद्रुक, सुगाव खुर्द ते भानपूर या मार्गावरील शिवरस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाले होते. संबंधित शेतकऱ्यांना रस्त्याचे महत्त्व समजावून सांगून त्यांच्या सहमतीने आज  22 मे 2026 रोजी सुमारे १.५ कि.मी. लांबीचा रस्ता खुला करण्यात आला.

मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यात शिवरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

या कारवाईवेळी नायब तहसीलदार (महसूल) सुनिल माचेवाड, मंडळ अधिकारी नाळेश्वर, कुणाल जगताप, तलाठी सज्जा वाघी राजेश बरोडा तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

यापुढेही अशाच प्रकारचे शिवरस्ते खुले करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संजय वारकड यांनी सांगितले. तसेच रस्ते अडविणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे शासकीय लाभांपासून वंचित ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला.

पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना चिखलातून जावे लागत होते. आता रस्ता मोकळा झाल्याने शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.

यावेळी दत्ता भोसले, बाबुराव शिंदे, नामदेव शिंदे, दत्तराव तातेराव भोसले, विजय भोसले, गंगाधर भोसले, संतोष भोसले, जळबाजी भोसले आदी शेतकरी उपस्थित होते.

00000



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   नांदेड विधान परिषदेच्‍या स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघा ची व्दिवार्षीक निवड णुकीच्या अनुषंगाने विविध आदेश निर्गमीत   न...