वृत्त क्रमांक
जनगणना कामाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाची लोहा तालुक्यास भेट
नांदेड, दि. 22 मे : जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या पाहणीसाठी आज 22 मे 2026 रोजी जनगणना केंद्रीय पथकाने लोहा तालुक्यास भेट दिली.
या पथकात जनगणना सहसंचालक श्री. शर्मा, सहाय्यक संचालक श्री. पांडे, श्री. बी. प्रसाद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथील जनगणना कक्ष सहाय्यक लतीफ पठाण यांचा समावेश होता.
संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व पर्यवेक्षकांची बैठक घेऊन आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यात आतापर्यंत झालेल्या जनगणना कामाचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी लोहा जनगणना ग्रामीण चार्ज अंतर्गत सर्वप्रथम जनगणनेचे नियुक्त काम पूर्ण करणारे प्रगणक श्री. लिंगोजी गणपती वाघमारे (सहशिक्षक) तसेच संबंधित पर्यवेक्षकांचा सत्कार करण्यात आला.
तहसीलदार तथा चार्ज अधिकारी (ग्रामीण) लोहा विठ्ठल परळीकर यांनी नियुक्त 64 पर्यवेक्षकांना त्यांच्या अखत्यारीतील 359 प्रगणकांकडून जनगणनेचे काम अचूक व वेळेत पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या आणि पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
०००००
No comments:
Post a Comment