Saturday, February 28, 2026

वृत्त क्रमांक  

हमीभावने चणा खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू

नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये हमीभावाने चणा खरेदीसाठी 1 ते 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे एकूण 23 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील चणा या पिकांचा ऑनलाईन नोंद असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकपासबूक आदी कागदपत्रके संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी.

• तालुका खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव, बिलोली (कासराळी), लोहा.
• कुंडलवाडी विविध कार्यकारी से.सह.सो. कुंडलवाडी ता.बिलोली.
• नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह.संस्था (अर्धापुर).
• पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, ता.देगलुर.
• बळीराम पाटील फळे व भाजीपाला सह.ख.वि.संस्था (बेरळी) ता.मुखेड.
• मुखेड फळे व भाजीपाला सह.ख.वि.संस्था (उमरदरी) ता.मुखेड.
• किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया  सह. संस्था गणेशपूर (ता. किनवट).
• जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सह.संस्था (कौठा) ता.कंधार.
• स्वामी विवेकानंद अभिनव सह.संस्था (शेळगाव थडी) ता. धर्माबाद.
• अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव).
• महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ बापशेटवाडी (मुक्रामाबाद) ता.मुखेड.
• राधामाई फार्मर प्रोडयुसर कंपनी रातोळी  ता.नायगाव.
• पांडुरंग फळे व भाजीपाला सहकारी संस्था धामनगाव ता.मुखेड.
• बळीराजा पणन अभिनव सहकारी संस्था कोठारी ता.किनवट.
• श्रीराम जाणकी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ सगरोळी ता. बिलोली.
• चक्रधर फळे व भाजीपाला सहकारी संस्था बिल्लाळी ता.मुखेड.
• स्वामी विवेकानंद अभिनव नाविन्यपुर्ण सहकारी संस्था चाकुर ता.देगलूर.
• स्व. प्रमोद महाजन अभिनव नाविन्यपुर्ण सहकारी संस्था पाळा ता. मुखेड.
• जगदंबा विद्या प्रसारक मंडळ बाऱ्हाळी ता. मुखेड.
• सिद्राम फार्मर प्रोडयुसर कंपनी बेटमोगरा ता.मुखेड.

या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत चणा खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु होणार आहे. सदरील नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने पीओएस मशीनद्वारे करण्यात येणार असल्याने नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी  केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे जिल्हा पणन अधिकारी राजेश गव्हाणे   यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  नवी मुंबई हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्ताने खारघर येथील कार्यक्रम #हिंददीचादर #श्रीगुर...