Sunday, February 22, 2026

वृत्त क्रमांक 233

28 फेब्रुवारी रोजी भोकर येथे शासकीय सेवांचा महामेळावा 

नांदेड दि.22 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र ब्रम्हे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन व तालुका विधी सेवा समिती भोकर तसेच अभिवक्ता संघ भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी 2026 रोजी भोकर येथे हनुमान नगर, खुले मैदान, किनवट रोड, भोकर येथे शासकीय सेवांचा महामेळावा आयोजित केला आहे. 

या मेळाव्यात आरोग्य शिबिरासह शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. नागरिक, ग्रामस्थांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा  प्राधिकरणाचे  सचिव शरद देशपांडे व भोकर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मोहमद नासिर मोहम्मद सलीम यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्...