जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन.
Wednesday, November 20, 2024
नांदेड लोकसभेसाठी आज सकाळी 9.30 वाजता 6.03 तर विधानसभेसाठी 5.42 टक्के मतदान
नांदेड , दि.20 नोव्हेंबर :- आज सकाळी 7 वाजेपासून नांदेड जिल्ह्यात उर्त्स्फूतपणे मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगाच रांगा दिसून आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात आज सकाळी 9.30 वाजेपर्यत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 6.03 टक्के तर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 5.42 टक्के मतदान झाले आहे.
नागरिकांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात 9 मतदार संघात 83-किनवट मतदारसंघात 5.75 टक्के, 84-हदगाव मतदारसंघात 3.02 तर 85-भोकर मतदारसंघात 3.64 टक्के , 86-नांदेड उत्तर 6.02, नांदेड दक्षिण 7.86, 88-लोहा मतदारसंघात 3.61, 89-नायगाव मतदारसंघात 7.63 टक्के, 90-देगलूर मतदारसंघात 6.9 टक्के, ९१-मुखेड मतदारसंघात 4.01 टक्के मतदान झाले आहे.
00000
नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे मतदान केंद्रांवर मतदाराचे स्वागत करून मतदानाला सुरुवात झाली आहे ग्रामीण भागात मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...



.jpeg)




.jpeg)


.jpeg)

.jpeg)





.jpeg)




.jpeg)












