Thursday, July 30, 2026

 वृत्त क्रमांक 

महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा

नांदेड, दि. 30 जुलै : महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड जिल्हा दौरा येत्या 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली.

बैठकीस किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी बी. सरवनन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, मनपा, सार्वजनिक बांधकाम, कृषी, क्रीडा, महावितरण, जलसंपदा, वन विभाग, पुशसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड यांनी समितीच्या दौऱ्याचे स्वरूप, समितीचे अधिकार तसेच संबंधित विभागांनी आवश्यक माहिती व कार्यवाहीसह बैठकीस उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शन केले. निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनीही दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात विविध बाबींवर उपयुक्त सूचना दिल्या.

00000



No comments:

Post a Comment

वृत्त  आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्यांत करावी– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांची ...