Sunday, June 28, 2026

वृत्त क्रमांक

तख्त सचखंड श्री हुजूर  साहिब  गुरुद्वारात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी घेतले दर्शन 

नांदेड, दि. 28 जून :- केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहिब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांचे कुटूंबिय यांची उपस्थिती होती. 

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा कृषी अधीकारी दत्तकुमार कळसाईत, एमआयडीसी मॅनेजर गजानन कपाळे आदीची उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय मंत्री चिराग पासवान  यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात लंगर प्रसाद घेवून सेवा केली. 

00000










No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   नांदेड शहरातील श्री सूर्य गणेश मंडळ येथे लोकसंवादाचा जागर • लोकसंवाद कार्यक्रमातून नागरिकांना दिली वैद्यकीय सहाय्यता व रोज...