Monday, February 17, 2025

 वृत्त क्रमांक 187

रस्ता व रेल्वे पुलाच्या कामामुळे 

वाहनासाठी पर्यायी मार्ग  

नांदेड दि. 17 फेब्रुवारी :-निळा जं. शंकरराव चव्‍हाण चौक-गाडेगाव-ब्राम्‍हणवाडा-मुगट-आमदुरा-वासरी-शंखतिर्थ-माळकौठा-बळेगाव-कारेगाव फाटा-बाभळी फाटा-बेलूर-नायगाव ते राज्‍य सिमा रस्‍त्‍याची सुधारणा करण्यासाठी तसेच प्रजिमा-83 जि. नांदेड  याकामांतर्गत गाडेगाव येथील रेल्‍वे ओव्‍हर ब्रिजचे काम प्रगतीत असल्‍याने जडवाहने पर्यायी मार्गाने वळविण्‍याबाबत अधिसुचना निर्गमीत करण्यात आली आहे. 

मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार  जिल्हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी संबधीत विभागाने दिलेल्या अटी व शर्तीनुसार उपाययोजना करतील या अटीवर तसेच, संबधीत विभागाने  पुढील उपाययेाजना  करुन तसेच 20 फेब्रुवारी ते 20 मार्च 2025 पर्यंत  नमुद  केलेल्‍या  पर्यायी मार्गाने  सर्व प्रकारची वाहने वळविण्‍यास  मान्‍यता  देण्‍यात आली आहे.

वाहनांसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेला मार्ग निळा जं. शंकरराव चव्‍हाण चौक-गाडेगाव-ब्राम्‍हणवाडा-मुगट व  निळा जं.शंकरराव चव्‍हाण चौक-गाडेगाव-ब्राम्‍हणवाडा-मुगट आहे. या मार्गासाठी पर्यायी मार्ग (जाणे-येणेसाठी) जड वाहनांकरीता शंकरराव चव्‍हाण चौक-बोंढार तर्फे हवेली-वाजेगाव-शिकारघाट-मुगट राहील. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता- गाडेगाव-बोंढार तर्फे हवेली ते देगलूर नाका ग्रामीण मार्ग 37 हा राहील. 

पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व  सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती उपाययोजना करावी. ही अधिसुचना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांच्या  कार्यालयामार्फत स्‍थानिक मराठी, हिन्‍दी, इंग्रजी व ऊर्दु वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी रस्‍ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्‍त्‍यासाठी आवश्‍यक असलेले बोर्ड, चिन्‍ह लावणे इत्‍यादी बाबतची कार्यवाही करावी. ही अधिसूचना आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी निर्गमीत करण्‍यात आली आहे. 

00000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...