Monday, February 17, 2025

 वृत्त क्रमांक 189

राज्‍यस्‍तरीय महसूल क्रीडा व सांस्‍कृतिक स्पर्धांचे 

21, 22 व 23 फेब्रुवारी कालावधीत आयोजन

 विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार स्पर्धेचे उद्घाटन 

नांदेड दि. 17 फेब्रुवारी :- राज्‍यस्‍तरीय महसूल क्रीडा व सांस्‍कृतिक स्‍पर्धा-2025 या येत्या 21, 22 व 23 फेब्रुवारी कालावधीत नांदेड येथे आयोजित करण्‍यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या हस्‍ते शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे राहणार आहेत. तर गृह, महसूल, ग्रामविकास, अन्‍न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच सर्व विभागीय आयुक्‍त, नांदेडचे तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी, इतर जिल्‍हातील जिल्‍हाधिकारी व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धा छत्रपती संभाजीनगर विभागाच्‍यावतीने घेण्यात येत आहेत.

या स्‍पर्धेसाठी लागणाऱ्या आवश्‍यक बाबीची जिल्‍हाधिकारी राहूल कर्डिले व इतर अधिकारी यांच्‍यासमवेत आज 17 फेब्रुवारी रोजी पाहणी करण्‍यात आली. तसेच स्‍पर्धेसाठी उभारण्‍यात येणारे गुरूगोविंदसिंघ स्‍टेडियम नांदेड येथील मंडपाचे जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांच्‍या हस्‍ते भूमिपुजन करण्‍यात आले आहे. त्‍याच्‍यासोबत महसूल अधिकारी, इतर अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. 

000000



No comments:

Post a Comment