Monday, February 17, 2025

  वृत्त क्रमांक 188

​नांदेडला जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन​ 

नांदेड दि. 17 फेब्रुवारी :- आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती 19 फेब्रुवारी 2025 निमीत्त "जय शिवाजी- जय भारत पदयात्रा" चे आयोजन केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वा. "जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे " आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापासुन सुरुवात होणार आहे. पुढे ही पदयात्रा चिखलवाडी कॉर्नरमार्गे तहसिल कार्यालय ते अण्णाभाऊ साठे पुतळा ते आयटीआय चौक (महात्मा ज्योतिबा फुले पुतळा) मार्गे शिवाजीनगर ते वजिराबाद चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन या पदयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. 

नांदेड जिल्हयातील सर्व मान्यवर,  लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी, सर्व शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी, खेळाडू, विविध क्रीडा संघटनेचे खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक व पदाधिकारी, विद्यापीठे, एनजीओ, एनएसएस, एन.वाय.के संस्था व My Bharat Volunteers, एनसीसी व आदींनी या पदयात्रेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन सहभाग नोंदवावा व शासकीय उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग (प्राथ./माध्य), जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 209 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा दौरा   नांदेड दि.   21 फेब्रुवारी   ...