परराज्यातील वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र
नूतनीकरण, पूर्ननोंदणीच्या शुल्कात वाढ
नांदेड (जिमाका) दि. 4 :- केंद्र शासनाने 4 ऑक्टोंबर 2021 च्या अधिसूचनेद्वारे केंद्रीय
मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 47 व नियम 81 मध्ये सुधारणा करुन विविध शुल्कात
वाढ केली आहे. या सुधारणेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून सुरु करण्यात आली आहे.
ही अधिसूचना केंद्र सरकारच्या morth.gov.in या संकेतस्थळावर व तसेच
कार्यालयीन सुचना फलकावर उपलब्ध आहे. या अधिसूचनेप्रमाणे वाहन 4.0 प्रणालीमध्ये परराज्यातील
वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व पूर्ननोंदणीच्या शुल्कात वाढ करण्यात आली
आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment