प्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत
महसूल वसुलीचे 106 टक्के उद्दीष्ट पूर्ण
नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाने सन 2021-22 मध्ये महसूल वसुली व अंमलबजावणी कामकाजात महसूल वसुलीच्या 106 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या विभागात नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. महसूल वसुली कामात उद्दिष्ट 177 कोटी रुपये एवढे होते यात 188 कोटी रुपयाची पूर्तता करून 106 टक्के कामाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. तर अंमलबजावणी कामकाजात 738 लाख रुपयाचे उद्दीष्ट देण्यात आले होते यात 696 लाख रुपयाची उद्दीष्ट पूर्तता करून 94 टक्के हे काम पूर्ण केले आहे.
नांदेड विभागाने एकुण 188 कोटी रुपयाची महसूल वसुली केली आहे. वाहन अंमलबजावणी (वाहन तपासणी) कामात 13 हजार 420 दोषी वाहनधारकांकडून 696 लाख रुपये इतका दंड वसूल केला आहे. आकर्षक नोंदणी क्रमांकाद्वारे नांदेड कार्यालयाने 2 हजार 184 वाहनांकडून 168 लाख रुपये इतका महसूल प्राप्त केला आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रादेशिक
विभागाने मागील तीनही आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली असून शासनाने दिलेल्या
महसूल वसुलीचे 100 टक्के
उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी, हिंगोली
कार्यालानेही त्यांचे काम चांगले पार पाडले आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात सुद्धा
या विभागाकडून महसूल वसुलीसाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असे प्रादेशिक परिवहन
अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment