Sunday, May 4, 2025

 📷 नवी मुंबई

डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरुळ येथे ‘ग्लोबल प्रीमियर ऑफ वंडरमेंट - ए. आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट’ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती. #WAVES2025 #WAVES #WAVESIndia #WAVESummit #WAVESummitIndia




 चतुरस्त्र अभिनेते-सर्जनशील निर्माते आमिर खान यांनी वेव्हज 2025 मध्ये क्रिएटोस्फियर मंचावर ‘अभिनयाची कला’ या विषयावरील त्यांच्या अतिशय सहजसोप्या आणि उपयुक्त सल्ल्यांनी अनेकांची मने जिंकली.

“मी प्रशिक्षित अभिनेता नाही. माझी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाण्याची इच्छा होती, पण जमलं नाही. मी माझ्या वाटचालीत ज्या लहान-लहान गोष्टी शिकलो, त्या माझ्यासाठी उपयोगी ठरल्या.”- अभिनेते-निर्माते आमिर खान




 अद्भुत विचारमंथन, परस्पर सहकार्याचा विश्वास, अनेक क्षेत्र, अनेक विषय, गाभा एकच तो म्हणजे कनेक्टिविटी ! अर्थात

 वेव्हज् 2025 मध्ये मोशन पिक्चर असोसिएशनने (एमपीए) भारताच्या मनोरंजन अर्थव्यवस्थेवर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव दर्शविणारा सर्वसमावेशक अहवाल सादर केला. भारत सरकार सर्जक-प्रथम परिसंस्थेच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले.





 अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. ॲनिमेशन क्षेत्रात #एआय चा वापर वाढला असला तरी सर्जनशीलता येणार नाही, ते कृत्रिम दिसेल, नैसर्गिक हे नैसर्गिकच राहणार असल्याचा सूर चर्चासत्रात उमटला.

वेव्हज् 2025 परिषदेत 'चेंजिंग डायनामिक्स ऑफ एव्हीजीसी एक्सआर इन एआय एरा : हाऊ टू ब्रिज इंडस्ट्री अँड अकॅडमी' या विषयावरील चर्चासत्रात अमेरिकन शिक्षणतज्ञ ब्रियना याऱ्हौसे, अमेरिकेतील ऍनिमेशन तज्ञ प्रमिता मुखर्जी, अस्पाचे संचालक संजय खिमेसरा यांनी सहभाग घेतला.




शिल्पकलेद्वारे इतिहास समजून घेऊन तो इतिहास आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती कलात्मक अभिव्यक्ती न राहता समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम तयार होते, असे टेक्निकल गेम्स कंपनीचे कला दिग्दर्शक पी.एम. विचारे यांनी सांगितले.

वेव्हज् 2025 परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या 'वर्कशॉप ऑन डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरा' या विषयावर कला दिग्दर्शक पी.एम. विचारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.




राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...