Tuesday, October 4, 2016

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न  
               नांदेड, दि. 4 :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नांदेड ज्येष्ठ नागरीक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य डॉ. हंसराज वैद्य, अशोक तेरकर, श्री. येवतीकर, एम. व्ही. सोनुले, श्री. रावके, डॉ. भा. दां. जोशी, पी. जी. नाईक, श्री. धानोरकर, ज्येष्ठ नागरीक संघटना सचिव सुभाष त्रिपाठी, श्री. हंम्बर्डे, के. डी. भोसकर, श्रीमती भोसकर, डॉ. सायन्ना मटमवार, किशनराव कदम, देविदास कल्याणकर, जगदीश नांदेडकर, इश्वर अम्मा, राजेशकुमार बास्तव, प्र. रा. कुरुभट्टे आदी ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.
               जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे सचिव ए. आर. कुरेशी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत सहाय्य व सल्ला, ज्येष्ठांसाठीच्या शासकीय योजना व सवलती त्याचप्रमाणे विविध कायदे विषयक माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. हंसराज वैद्य यांनी ज्येष्ठ नागरीकांच्या अडी-अडचणी, समस्या, त्यावरील उपाय यासंबंधी माहिती दिली. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. येवतीकर, नांदेड जिल्हा वकील अभियोक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. भेदे, अॅड. वाकोडकर, अॅड. शाहीद, श्री. तेरकर, सुभाष त्रिपाठी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अॅड. बंगाळे यांनी केले तर आभार ज्येष्ठ नागरीक संघाचे सचिव सुभाष त्रिपाठी यांनी मानले.

000000

Monday, October 3, 2016

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
आरक्षणासाठी 5 ऑक्टोंबर रोजी सोडत होणार
           नांदेड, दि. 3 :-  नांदेड जिल्‍हयातील आगामी जिल्‍हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्‍या प्रवर्गातुन (सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) महिलांचे आरक्षण देय जागासाठी राज्‍य निवडणूक आयेागाने ठ‍रवून दिलेल्‍या विहीत पध्‍दतीने सोडतीव्‍दारे बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 पार पाडणार आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.   
जिल्‍हा परिषद निवडणूक विभागांच्‍या बाबतीत बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. व पंचायत समिती निर्वाचक गणांची संबंधीत तालुक्‍याच्‍या मुख्‍यालयी बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी त‍हसिल कार्यालयामार्फत सोडतीने आरक्षण निश्‍चीत होणार आहे.  
तालुकास्‍तरीय आरक्षण सोडतीचा तपशील पुढील प्रमाणे आहे.  
अ.क्र.
जिल्‍हा परिषदचे नांव / पंचायत समितीचे नांव
सभेचा दिनांक
सभेचे ठिकाण
सभेची वेळ 
1
नांदेड जिल्‍हा परिषद
(जिल्‍हा परिषद गटासाठी
दि. 5/10/2016
बचत भवन,जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड
स. 11.00 वा. 
2
पंचायत समिती माहूर
(पंचायत समिती गणासाठी) 
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय माहूर
स. 11.00 वा.

3
पंचायत समिती किनवट
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट
दु. 3.00 वा.
4
पंचायत समिती हिमायतनगर
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
वसंतराव नाईक सभागृह, पंचायत समिती
हिमायतनगर
स. 11.00 वा.
5
पंचायत समिती हदगाव
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
पंचायत समिती सभागृह  हदगाव 
दु. 3.00 वा.

6
पंचायत समिती अर्धापूर
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय अर्धापूर
स. 11.00 वा.

7
पंचायत समिती नांदेड
(पंचायत समिती गणासाठी) 
दि. 5/10/2016
उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे बैठक कक्ष, प्रशासकीय इमारत, चिखलवाडी नांदेड  
दु. 3.00 वा.
8
पंचायत समिती मुदखेड
(पंचायत समिती गणासाठी)
 
दि. 5/10/2016
 तहसिल कार्यालय मुदखेड
स. 11.00 वा.

9
पंचायत समिती भोकर
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय भोकर
दु. 3.00 वा.
10
पंचायत समिती उमरी
(पंचायत समिती गणासाठी) 
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय प्रशासकीय इमारत उमरी 
स. 11.000 वा.
11
पंचायत समिती धर्माबाद
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
  
नगर परिषद सभागृह धर्माबाद   
दु. 3.00 वा.
12
पंचायत समिती बिलोली
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
पंचायत समिती सभागृह,बिलोली 
स. 11.00 वा.
13
पंचायत समिती नायगाव खै. (पंचायत समिती गणासाठी) 
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय, नायगाव खै.
दु. 3.00 वा.
14
पंचायत समिती लोहा
(पंचायत समिती गणासाठी) 
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय लोहा
स. 11.00 वा.
15
पंचायत समिती कंधार
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय, कंधार 
दु. 3.00 वा.
16
पंचायत समिती मुखेड
(पंचायत समिती गणासाठी)   
दि. 5/10/2016
तहसिल कार्यालय, मुखेड
स. 11.00 वा. 
17
पंचायत समिती देगलूर
(पंचायत समिती गणासाठी)  
दि. 5/10/2016
पंचायत समिती सभागृह देगलूर  
दु. 3.00 वा.

याबाबतचा सविस्‍तर तपशील जिल्‍हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्‍हा परिषद, पंचायत समिती कार्यालयाच्‍या नोटीस बोर्डावर लावण्‍यात आलेला आहे. ईच्‍छुकांनी या सोडतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केलेले आहे. तसेच जिल्‍हा परिषद प्रारुप निवडणूक विभाग, पंचायत समिती प्रारुप निर्वाचक गणांची प्रभागरचना सोमवार 10 ऑक्टोंबर 2016 प्रसिध्‍द झाल्‍यानंतर त्‍यावर गुरुवार 20 ऑक्टोंबर 2016 पर्यंत हरकती व सूचना जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे स्‍वीकारल्या जातील असे माहिती जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या जयंती निमित्त
15 ऑक्टोंबर रोजी “वाचन प्रेरणा दिनाचे” आयोजन
  ग्रंथप्रदर्शन व विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 3 :-  भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोंबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथप्रदर्शन, त्याअनुषंगाने इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 15 ऑक्टोंबर रोजी करावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व शासकीय व शासनमान्य ग्रंथालयांनी ग्रंथप्रदर्शन व इतर उपक्रम आयोजित करण्याची सूचना उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिनी 15 ऑक्टोंबर रोजी ग्रंथालयाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन व त्याअनुषंगाने इतर कार्यक्रम आयोजित करावे. या कार्यक्रमाचा अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी केले आहे.

0000000
उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी
सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2016  या वर्षासाठी गुरुवार 27 ऑक्टोंबर 2016 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.
      उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु  उद्योगांना पुरस्कार दिले जातात.  सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे  15 हजार रुपये व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
      जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी  पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या  वेळी,  उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी या कार्यालयाकडे ईएम भाग-2 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे व कमीत कमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापूर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे. नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी गुरुवार 27 ऑक्टोंबर 2016 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा,  असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000
जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात 50 अर्ज दाखल
संबंधीत विभागाने त्यावर त्वरेने कार्यवाही करावी 
नांदेड दि. 3 :- जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनामध्ये  आज  विविध  शासकीय  विभागाशी  संबंधीत  50 अर्ज  दाखल  करुन  घेण्यात  आले. जिल्हाधिकारी  कार्यालय  प्रांगणातील  बचत भवनात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन संपन्न झाला.
यावेळी पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा वनसंरक्षक सुजय डोडल, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक ( पशुसंवर्धन ) पी. पी. घुले, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. कोकणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू आदि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनामध्ये महसूल-18, जिल्हा परिषद- 11, जिल्हा अग्रणी बँक-9, जिल्हा उपनिबंधक - 3, महानगरपालिका- 3, इतर- 6 याप्रमाणे असे एकूण 50 अर्ज  दाखल  करुन  घेण्यात  आले. नागरिकांचे  म्हणणे  ऐकूण  संबंधीत  विभागांना  त्यावर  कार्यवाही  करण्याबाबत  निर्देश  देण्यात  आले.

000000

Sunday, October 2, 2016

कृपया सोबतच्या वृत्तास आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धी दयावी ही विनंती. - जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र प्रदर्शनातून उमटले राज्याच्या विकासाचे प्रतिबिंब
-         मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
मुंबई, दि. 2 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनातून बदलत्या महाराष्ट्राचे प्रतिबिंब उमटले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलादालनात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन व स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह,  ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, या छायाचित्र प्रदर्शनात मांडण्यात आलेली सर्व छायाचित्रे अत्यंत सुंदर आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने चांगली संकल्पना प्रत्यक्षात आणली. राज्यात दोन वर्षात घडलेल्या परिवर्तनाचे प्रतिबिंब या छायाचित्रांमधून उमटले आहे. एखादी गोष्ट प्रत्यक्ष बघितल्याशिवाय विश्वास बसत नाही अशा वेळी छायचित्र ही महत्वाची भूमिका बजावत असतात, असे सांगून ते पुढे म्हणाले की, छायचित्रकला ही नैसर्गिक स्वरूपात अभिव्यक्त होण्याचे माध्यम आहे. एका छायाचित्रातच हजार शब्दांचा आशय सामावलेला असतो. माध्यमांमध्ये छायाचित्रांशिवाय बातमीला महत्व नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी छायाचित्रकारांचा गौरव केला.
प्रदर्शनातील छायाचित्रांमधून मेक इन महाराष्ट्र, जलयुक्त शिवार, स्मार्ट सिटी अशा विविध शासकीय योजनांच्या यशाचे प्रतिबिंब उमटले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील गड किल्ले, कला, संस्कृती, वन्यजीव, बहुविविधतेचे आणि एकात्मतेचे दर्शनही होत आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रांचा समावेश असलेले ‘कॉफी टेबल बूक’ तयार करावे. राज्यात येणाऱ्या परदेशी शिष्टमंडळांना हे पुस्तक सचित्र महाराष्ट्राचा ठेवा म्हणून भेट देता येईल, दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यावेळी म्हणाले की, लोकांच्या नजरेतला महाराष्ट्र या छायाचित्रांच्या माध्यमातून दिसत असून प्रत्येक छायाचित्र आपली एक वेगळी कथा आहे. दोन वर्षांतील राज्याची प्रगती आणि जनतेमधील चैतन्य, राज्याचे प्रतिमा संवर्धन या छायाचित्रांमधून होत आहे. या सर्व छायाचित्रांचा समावेश असलेले कॉफी टेबल बुक तयार करण्यात येईल. प्रदर्शनासाठी राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 3800 छायाचित्रे प्राप्त झाली. दरवर्षी अशा प्रकारची स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.
छायाचित्र हे समाजाचे दस्तावेज असून नवीन पिढीसाठी इतिहास सांगण्याचे काम ते करीत असतात. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचे यश या छायचित्रांमधून दिसत आहे, असे श्री. ओलवे यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून छायाचित्रकारांना राजाश्रय मिळाल्याची भावना प्रथम क्रमांक विजेते देवदत्त कशाळीकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी छायाचित्र स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते देवदत्त कशाळीकर, द्वितीय क्रमांकाचे विजेते विद्याधर राणे, तृतीय क्रमांकाचे विजेते दिनेश भडसाळे  यांना अनुक्रमे पंधरा हजार, दहा हजार व पाच हजार रुपयांचा धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ बक्षिस विजेते सचिन मोहिते, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, सतिश काळे यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
छायाचित्र स्पर्धेचे परिक्षक श्री. ओलवे, गॅझेटर्स विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर, पीआयबीचे मुख्य फोटो अधिकारी अख्तर सईद, माध्यम तज्ज्ञ आशुतोष पाटील यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रदर्शनाच्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या लोकराज्य अंकाच्या स्टॉलला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी भेट दिली.
या कार्यक्रमास संचालक अजय अंबेकर, संचालक देवेंद्र भुजबळ, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा. ना. मुसळे, पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबिय यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. संचालक शिवाजी मानकर यांनी आभार मानले. पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचालन केले. दि. 5 ऑक्टोबर 2016 पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत सर्वांसाठी  खुले राहणार आहे.
0000000

अजय जाधव..2.10.2016
जिल्ह्यात हंगामात 107.92 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 9.65 मि.मी. 
           नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यात  सोमवार 3 ऑक्टोंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 154.45 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 9.65 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 1031.19 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-149.79, नांदेड-127.81, अर्धापूर-127.11, भोकर-123.47, कंधार-120.87, मुखेड-119.51, हदगाव-110.40, बिलोली-109.29, नायगाव-103.71, मुदखेड-99.82,  माहूर-99.48, धर्माबाद-96.04, हिमायतनगर-93.38, देगलूर-91.86, उमरी-91.49, किनवट-81.64. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  107.92 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात सोमवार 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 17.00 (1165.53), मुदखेड- 35.33 (852.02), अर्धापूर-19.33 (1105.33), भोकर-29.50 (1230.25), उमरी-6.67 (911.60), कंधार-निरंक (974.97), लोहा-5.00 (1248.17), किनवट-5.00 (1012.32), माहूर-2.25 (1233.50), हदगाव-17.71 (1078.98), हिमायतनगर-11.33 (912.64), देगलूर-3.33 (827.00), बिलोली-निरंक (1058.00), धर्माबाद-निरंक (879.38), नायगाव-2.00 (949.54), मुखेड-निरंक (1059.85) आज  अखेर  पावसाची सरासरी 1031.19 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 16499.08) मिलीमीटर आहे. 

00000

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...