Saturday, November 28, 2020

 

मुख्यालयी अथवा कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या  

अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सर्वसामान्य नागरिकांची व शासकिय कामे वेळच्यावेळी पूर्ण व्हावीत यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्ष असले पाहिजे. जिल्ह्यातील विविध प्रशासकिय विभागातील काही अधिकारी, कर्मचारी आपल्या कार्यालयात अथवा मुख्यालयी हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जे कर्मचारी / अधिकारी शासकिय कामात टाळाटाळ करीत आहेत अथवा कार्यालय सोडून बाहेर थांबतात अशांविरुद्ध शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दिले आहेत. 

सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या व मुख्यालयी न थांबणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासन परिपत्रक क्रमांक सिडीआर-1300/प्र.क्र.9/00/11 दिनांक 17 ऑगस्ट 2000 अन्वये शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जे अधिकारी, कर्मचारी विनापरवानगीने कार्यालयात गैरहजर राहिल्यास अथवा विनाअनुमती मुख्यालय सोडून गेल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करण्याची तरतुद केली आहे. 

याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम 1979 मध्ये प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांने नेहमीच कर्तव्य परायनता ठेवावी आणि शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल अशा कोणत्याही गोष्टी करता कामा नयेत, असा स्पष्ट उल्लेख करुन प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीवही करुन दिली आहे. 

शासनाच्या या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित राहून शासकीय, नागरिकांची कामे पार पाडावीत, असे स्पष्ट करुन गैरहजर अथवा कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा देय असलेला घरभाडे भत्ता कपात करण्याची कार्यवाही करुन, संबंधीत विभाग प्रमुख यांनी त्यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी, असे निर्देशीत केले आहे. याचबरोबर सर्व संबंधीत विभाग प्रमुखांनी शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून नागरीकांचे व शासनाचे कामे वेळेत होण्यासाठी Geofenced Attendance System कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, असे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 24 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमीत केले.

00000

 

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 

ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत 31 डिसेंबरपर्यंत वाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी गुरुवार 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे. 

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतुदीनुसार 14 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश 31 ऑक्टोंबर 2020, 4 व 15 नोव्हेंबर 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात गुरुवार 31 डिसेंबर 2020 पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. 

या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. 28 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमित केले आहेत.

0000

 

61 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

71 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- शनिवार 28 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 61 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 23 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 38 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 71 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या एकुण 1 हजार 893 अहवालापैकी 1 हजार 799 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 325 एवढी झाली असून यातील 19 हजार 180 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 404 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवार 27 नोव्हेंबर 2020 रोजी मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 548 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 32, बिलोली कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, अर्धापूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, नायगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, भोकर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 71 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.36 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 17, नांदेड ग्रामीण 2, धर्माबाद तालुक्यात 1, हदगाव 2, मुखेड 1 असे एकुण 23 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 12, हदगाव तालुक्यात 1, किनवट 1, लोहा 3, मुखेड 11, देगलूर 9, निजामाबाद 1 असे एकुण 38 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 404 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 42, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 18, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, नांदेड जिल्ह्यातील गृह विलगीकरण 89, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 132, खाजगी रुग्णालय 37 आहेत. 

शनिवार 28 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 60 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 48 हजार 953

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 24 हजार 373

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 325

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 180

एकूण मृत्यू संख्या- 548

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-793

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-404

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

Friday, November 27, 2020

 

फौजदारी प्रक्रिया संहितानुसार

विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक   

नांदेड (जिमाका) दि. 27 :- 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्‍यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, लोहा, कंधार, नांदेड अर्धापूर या 16 तालुक्यातील 123 मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रांतर्गत नियुक्त 54 क्षेत्रिय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्र हद्दीपर्यंत 27 नोव्हेंबर 2020 रोजी 6 वाजेपासून ते 1 डिसेंबर 2020 या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. अशाप्रकारे नियुक्‍त विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना उक्‍त संहितचे कलम 129, 133, 143 व 144 खाली अधिकार प्रदान केले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 27 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमीत केले आहेत.

000000

 

 

68 कोरोना बाधितांची भर तर    

59 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी   

नांदेड (जिमाका) दि. 27 :- शनिवार 27 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 68 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 49 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 19 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 59 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या एकुण 1 हजार 630 अहवालापैकी  1 हजार 521 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  20 हजार 264 एवढी झाली असून यातील  19  हजार 109 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 416 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आज प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 547 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 37, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 11, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1 असे एकूण 59 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.30 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 34, देगलूर तालुक्यात 1, लोहा 2, जळगाव 1, पटना बिहार 8, ग्वाल्हेर मध्यप्रदेश 1, दिल्ली 2 असे एकुण 49 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 8, कंधार तालुक्यात 5, मुखेड 1, हिंगोली 2, हदगाव 1, किनवट 1, परभणी 1 असे एकुण 19 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 416 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 45, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 18, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, नांदेड जिल्ह्यातील गृह विलगीकरण 123, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 108, खाजगी रुग्णालय 44 आहेत.  

शुक्रवार 27 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 65 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 46 हजार 958

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 22 हजार 571

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 264

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 109

एकूण मृत्यू संख्या- 547

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.30 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-20

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-15

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-611

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-416

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

 

 

जिल्ह्यातील मद्यविक्रीचे दुकाने

29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत बंद 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या निवडणुकीदरम्यान नांदेड जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुढीलप्रमाणे बंद राहतील, असे आदेश निर्गमीत केले आहे. 

जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर रविवार 29 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून मतदानाच्या अगोदरचा दिवस सोमवार 30 नोव्हेंबर 2020 रोजी संपूर्ण दिवस तर मतदानाचा दिवस मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

00000

 

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान

मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सुचना 

नांदेड (जिमाका) दि. 27 :-05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार मतदान होणार असून भारत निवडणुक आयोगाने मत नोंदविण्यासाठी मतदारांना आवश्यक त्या सुचना निर्गमीत केल्या आहेत.

मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना

मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन यांचा वापर करु नये. ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Order of Preference) असे नमूद केलेल्या रकान्यात “1” हा अंक नमूद करुन मतदान करावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी “1” हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम 2, 3, 4 इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार “पसंतीक्रम” (Order of Preference) या स्तंभामध्ये दर्शवा. कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमूद करु नये. पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1,2,3 इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शवू नये. अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1,2,3 इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I,II,III इत्यादी किंवा संविधानाच्या 8 व्या अनुसूचितील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविता येतील. मतपत्रिकेवर तुमीच स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करु नये. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर (√) किंवा (×) अशी खुण करु नये, अशी मतपत्रिका बाद ठरेल. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर “1” हा अंक नमूद करुन तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे असून ते अनिवार्य नाहीत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर मतदारांनी मतदान करतांना या सूचनांचे पालन करुन आपले मतदान अवैध ठरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 5- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ यांनी  केले आहे.

000000

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...