Friday, August 19, 2016

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी
बुधवारी स्थानिक सुट्टी जाहीर 
नांदेड, दि. 19 – जिल्ह्यातील सप्टेंबर ते डिसेंबर 2016 या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या  सार्वत्रिक  व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यासाठी बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी निवडणूक  आयोगाच्या आदेशान्वये ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान होणार आहे. त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी त्या मर्यादीत क्षेत्रापुरती स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. 

000000 
ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी संबंधीत गावातील आठवडी बाजार बंद राहणार  
नांदेड दि. 19 :- जिल्ह्यातील सप्टेंबर ते डिसेंबर 2016 या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या  सार्वत्रिक  व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यासाठी बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी संबंधीत ग्रामपंचायतीच्या हद्दीत भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी काढले आहेत.
पणन संचालक पुणे यांनी ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीच्‍या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावता  यावा  तसेच  मतदान शांततेत पार पडावे यादृष्टिकोनातून ज्‍या ग्रामपंचायतीच्‍या हद्दीत मतदान होणार आहे अशा ठिकाणचे आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास आणि ते अन्‍य दिवशी भरवण्‍यास मान्‍यता दिली आहे. त्‍यानुसार  जिल्‍हा‍धिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी मार्केट ॲड फेअर ॲक्‍ट 1862 चे कलम 5 अन्‍वये प्रदान अधिकाराचा वापर करुन जिल्‍ह्यातील किनवट, माहूर, उमरी, मुखेड, भोकर, हदगाव, कंधार, नांदेड या आठ तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक तसेच 49 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी ज्‍या गावी, ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बंद ठेवण्‍यात यावेत व अशा ठिकाणचे आठवडी बाजार दुस-या दिवशी गुरुवार 25 ऑगस्ट 2016 रोजी भरविण्‍यात यावेत असे आदेशात नमूद केले आहे.

000000
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचा दौरा  
नांदेड दि. 19 :-  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे शनिवार 20 ऑगस्ट 2016 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 20 ऑगस्ट 2016 रोजी  जालना येथून मोटारीने सकाळी 11 वा. नांदेड येथे आगमन व “स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी” या कुटुंबस्तर संवाद अभियान कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- आनंद सागर मंगल कार्यालय आसना पुलाजवळ सांगवी. दुपारी 2 वा. भारतीय जनता पक्षाच्यावतीने  आयोजित  “आजादी के 70 साल याद करो कुर्बानी”  या कार्यक्रमांतर्गत महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तिरंगा रॅलीस सुरुवात. मार्ग- महाराणा प्रताप पुतळा ते स्वामी रामानंदतीर्थ पुतळा विमानतळ रोड नांदेड. दुपारी 4.30 वा. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तिरंगा यात्रेचा समारोप व स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- सहयोग एज्युकेशनल कॅम्पस विष्णुपुरी नांदेड. सायं. 6 वा. नांदेड येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील.

000000

Thursday, August 18, 2016

नोकरीच्या मागे न लागता
उद्योजक होणे काळाची गरज  
-          महेश पाटील
नांदेड दि. 18 –  अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी किंवा पदविका शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वत:चा उद्योग सुरु करुन उद्योजक होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन समुपदेशक महेश पाटील यांनी आज येथे केले.
         
नांदेड शासकीय तंत्रनिकेतन  येथे आयोजित प्रथम वर्ष पदविका विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी  विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र उद्योजकता प्रकल्प अधिकारी शंकर पवार  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य पी. डी. पोपळे उपस्थित होते.
शासनस्तरावर पदवी व पदविका प्रवेशासाठी यावर्षी नव्या पद्धतीचा वापर करुन विद्यार्थ्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत इच्छीत संस्था व शाखा निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याने पालक व‍ विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत प्रवेश पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर उत्तीर्ण होण्याचे प्रमाणे, गुणवत्ता, स्पर्धा परीक्षा यातून काही जणाना नोकरी मिळू शकते त्यामुळे अभियंता प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वत:चा विकास करण्याची भरपूर संधी असून स्वयंरोजगारावर  भर  देवून  स्वत:च्या विकासासोबतच देशाचा विकास करावा, त्यांनी उद्योग वाढविण्यावर भर दयावा व उद्योजक व्हावे, असे पाटील यांनी सांगितले.  
उद्योजक प्रकल्प अधिकारी श्री. पवार यांनी महिला उद्योजकता सक्षमीकरण अंतर्गत संस्थेत नोंदणी करुन महाराष्ट्र उद्योजकता मंडळामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात संस्थेचे प्राचार्य पी.डी. पोपळे यांनी विद्यार्थ्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देवून सर्व तासिकांना उपस्थित राहून अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे पार पाडा, असे सूचविले.
यावेळी विभाग प्रमुख डी. एम. लोकमवार, बी. व्ही. यादव, सी. व्ही. लहाडे, एस. एस. कंधारे, ए. टी. आढावे, एस. पी. कुलकर्णी, श्री. पवार, श्री. उश्केवार, डॉ. जी. एम. डक, तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन काम प्रा. बिटीगिरी यांनी तर अभार एस. पी. कुलकर्णी यांनी मानले.

000000
विधानपरिषद विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 18 – राज्य विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
शनिवार 20 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 3.30 वा. उदगीर येथून शासकीय मोटारीने अर्धापूर शासकीय विश्रागृह येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वा. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित केडर कॅम्प कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ सनशाईन फंक्शन हॉल अर्धापूर. सायंकाळी 5 वा. अर्धापूर येथून नांदेड रेल्वेस्टेशनकडे प्रयाण. सायंकाळी 5.45 वा. नांदेड रेल्वेस्टेशन येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000
रास्तभाव धान्य दुकानात
सप्टेंबरसाठीची साखर उपलब्ध
नांदेड दि. 18 - सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी  सप्टेंबर 2016 साठीची (सणासुदीचे नियतन) साखर रास्त भाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी कळवले आहे.
या नियतनानुसार प्रती व्यक्ती 660 ग्रॅम प्रमाणे साखर प्रौढ अथवा मुल-बालक अशा भेदभाव न करता शिधापत्रिकाधारकांना साखर वितरीत करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्याला आवश्यक 6 हजार 39 क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. तालुका निहाय उपलब्ध साखर पुढील प्रमाणे क्विंटल मध्ये : नांदेड- 675, हदगाव- 504, किनवट- 721, भोकर- 233, बिलोली-387, देगलूर-358, मुखेड-691, कंधार-471, लोहा-420, अर्धापूर-167, हिमायतनगर-251, माहूर-248, उमरी-198, धर्माबाद-200, नायगाव-331, मुदखेड-184. याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घेवून स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
लोकसहभागातून पांदनरस्ता
मोकळा करण्यास प्रारंभ
नांदेड, दि. 18 : राजस्व अभियानात लोकसहभागातून धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (बु) ते पाटोदा (खु) जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठी  जेसीबी  मशीनव्दारे  धर्माबादचे  प्रभारी तहसिलदार सुनिल माचेवाड यांच्या  हस्ते  नुकतेच सुरुवात  करण्यात  आले.
यावेळी  जारीकोटचे मंडळ  अधिकारी  अनिल परळीकर, पाटोदा (बु.) चे तलाठी एम.व्ही. पांचाळ, अशोक माधवराव वडजे, सरपंच लोकडोबा आबाजी वानखेडे, हणमंतराव पा. जाधव, पोलीस पाटील शंकरराव बाजीराव भायेगाये, बाबाराव जाधव, रामचंद्र पांडूरंग मेळगावे, दिगंबर बळीराम बाचेवाड, बाबू केरबा जाधव, रामराव महाजन जाधव, पिल्ले बालाजी शंकरराव, जारीकोटे इरवंत संजय, गोविंद लक्ष्मण मेळगावे, शिवाजी शेषराव वडजे आदी उपस्थित होते.

******

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...