Monday, October 12, 2020

 

235 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

74 बाधितांची भर तर एकाचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 12 :- सोमवार 12 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 235 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 74 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 41 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 33 बाधित आले. 

आजच्या एकुण 510 अहवालापैकी 427 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 494 एवढी झाली असून यातील  14  हजार 632 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 295 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 43 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार 11 ऑक्टोंबर रोजी विजयनगर सिडको नांदेड येथील 66 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 457 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 6, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 8, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 2, मुखेड कोविड केंअर सेंटर 28, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 157, हदगाव कोविड केंअर सेंटर 1, नायगाव कोविड केंअर सेंटर 5, कंधार कोविड केंअर सेंटर 5, खाजगी रुग्णालय 15 असे 235 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 86.44 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 27, भोकर तालुक्यात 2, लोहा 1, माहूर 1, बिलोली 1, कंधार 1, नांदेड ग्रामीण 2, हिमायतनगर 1, किनवट 1, हदगाव 1, मुखेड 1, यवतमाळ 2 असे एकुण 41 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 15, लोहा तालुक्यात 1, माहूर 1,  भोकर 2, किनवट 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 1, देगलूर 1, कंधार 2, नायगाव 4 असे एकूण 33 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 295  बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 134, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 419, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 61, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 51, आयुर्वेदिक शासकीय महा.कोविड रुग्णालय सेंटर 8, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 45, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 28, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 48,  मांडवी कोविड केअर सेंटर 13, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 8, लोहा कोविड केअर सेंटर येथे 29, हदगाव कोविड केअर सेंटर 29, भोकर कोविड केअर सेंटर 16,  बारड कोविड केअर सेंटर 4, मुदखेड कोविड केअर सेटर 11, माहूर कोविड केअर सेंटर 11, किनवट कोविड केअर सेंटर येथे 41, धर्माबाद कोविड केअर सेंटर 23, उमरी कोविड केअर सेंटर 49, कंधार कोविड केअर सेंटर येथे 14, अर्धापूर कोविड केअर सेंटर 24, खाजगी रुग्णालयात दाखल 218, लातूर येथे संदर्भित 4, निजामाबाद 4, आदिलाबाद 2, परभणी येथे संदर्भित 1 झाले आहेत. 

सोमवार 12 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 73, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 85 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 93 हजार 538,

निगेटिव्ह स्वॅब- 72 हजार 959,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 494,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 14 हजार 632,

एकूण मृत्यू संख्या- 457,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 86.44

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 732, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 295,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 43.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

0000

 

 नांदेड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाकडून

अधिकृत 705 माथाडी कामगारांना मदत    

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे नांदेड जिल्ह्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने मंडळाच्या राखीव निधीमधून यथाशक्य मदत व्हावी असे निर्देश सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी मंडळाचे अध्यक्षांनी नांदेड जिल्हा मंडळाला दिले होते. याप्रमाणे नांदेड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने एक ठराव घेऊन मंडळाच्या राखीव निधीमधून प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे मंडळातील 705 माथाडी कामगारांना एकुण 21 लाख 15 हजार रुपयाची आर्थिक मदत माथाडी कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. 

ही मदत माथाडी कामगारांना पोहचावी यासाठी राज्याचे कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय झाला होता. आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते या मदतीचा प्रातिनिधीक धनादेश नांदेड हमाल माथाडी हातगाडा संघटनेचे सचिव भुजंग कसबे, विनायक सुर्यवंशी, शिवाजी दराडे, ट्रान्सपोर्ट ॲड डॉक वकर्स युनियनचे सहसचिव शिलन सोनकांबळे, मैनोद्दीन पठाण, प्रतापसिंह ठाकूर, प्रभाकर वाघमारे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त मोसीन सय्यद, मंडळाचे सचिव अविनाश देशमुख, निरिक्षक डी. पी. फुले, व्हि. एच. पाटील, एम. एम. नाईक आदी उपस्थित होते.

00000




 

Sunday, October 11, 2020

 

205 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

120 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 11 :- रविवार 11 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 205 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 120 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 52 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 68 बाधित आले. 

आजच्या एकुण 877 अहवालापैकी  710 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 420 एवढी झाली असून यातील  14  हजार 397 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 461 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 48 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवार 10 ऑक्टोंबर रोजी तरोडा नांदेड येथील 53 वर्षाच्या एका महिलेचा, कंधार तालुक्यातील धानोरा येथील 71 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर बिलोली तालुक्यातील आजमपूर येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर रविवार 11 ऑक्टोंबर रोजी मुदखेड येथील 71 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 456 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 10, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 2, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 2, मुखेड कोविड केंअर सेंटर 9, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 145, बिलोली कोविड केंअर सेंटर 1, खाजगी रुग्णालय 19, मुदखेड कोविड केंअर सेंटर 4 असे 205 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 85.40 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 29, अर्धापूर तालुक्यात 1, किनवट 3, नायगाव 2, कंधार 2, हिंगोली 6, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1, देगलूर 2, उमरी 1, परभणी 2, यवतमाळ 2 असे एकुण 52 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 15, लोहा तालुक्यात 2, माहूर 4,  भोकर 3, अर्धापूर 1, किनवट 7, मुखेड 3, नांदेड ग्रामीण 9, मुदखेड 6, देगलूर 2, कंधार 1, बिलोली 12, नायगाव 3 असे एकूण 68 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 461 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 137, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 502, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 66, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 36, आयुर्वेदिक शासकीय महा.कोविड रुग्णालय सेंटर 8, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 47, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 29, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 69,  मांडवी कोविड केअर सेंटर 13, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 10, लोहा कोविड केअर सेंटर येथे 28, हदगाव कोविड केअर सेंटर 30, भोकर कोविड केअर सेंटर 16,  बारड कोविड केअर सेंटर 3, मुदखेड कोविड केअर सेटर 11, माहूर कोविड केअर सेंटर 25, किनवट कोविड केअर सेंटर येथे 33, धर्माबाद कोविड केअर सेंटर 31, उमरी कोविड केअर सेंटर 80, कंधार कोविड केअर सेंटर येथे 19, अर्धापूर कोविड केअर सेंटर 27, खाजगी रुग्णालयात दाखल 231, लातूर येथे संदर्भित 3, निजामाबाद 4, आदिलाबाद 2, परभणी येथे संदर्भित 1 झाले आहेत. 

रविवार 11 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 72, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 51, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 65 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 93 हजार 135,

निगेटिव्ह स्वॅब- 72 हजार 270,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 420,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 14 हजार 397,

एकूण मृत्यू संख्या- 456,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 85.40

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 29,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 706, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 461,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 48.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

0000

 

Saturday, October 10, 2020

 

हवामानावर आधारित फळपिक विमा

योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे  

नांदेड (जिमाका) दि. 10 :- हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही नांदेड जिल्हयात केळी, आंबा, मोसंबी या पिकांसाठी लागु केली आहे. या योजनेंतर्गत सन 2020 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या फळपिकांना अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, आर्द्रता, वेगाचा वारा व गारपीट या हवामान धोक्यापासुन संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे विमा हप्ता रक्कम भरुन पिक संरक्षित करणे आवश्यक आहे. 

आबिंया बहार विमा हप्ता दर पुढीलप्रमाणे आहेत. केळी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम नियमित 1 लाख 40 हजार रुपये तर गारपीटसाठी 46 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 7 हजार रुपये तर गारपीट 2 हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2020 आहे. 

आंबा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम नियमित 1 लाख 40 हजार रुपये तर गारपीट 46 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 7 हजार रुपये तर गारपीट 2 हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2020 आहे. 

मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम नियमित 80 हजार रुपये तर गारपीट 26 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 4 हजार रुपये तर गारपीट 1 हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2020 आहे. 

ही योजना नांदेड जिल्ह्यात अधिसुचित फळपिकांसाठी पुढीलप्रमाणे अधिसुचित महसुल मंडळांना लागू राहिल. यात अधिसुचित केळी फळपिकासाठी नांदेड तालुक्यात तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. अर्धापुर तालुक्यात अर्धापुर, दाभड, मालेगाव. मुदखेड तालुक्यात मुदखेड, मुगट, बारड. लोहा तालुक्यात शेवडी बा. हदगाव तालुक्यात हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी. भोकर तालुक्यात भोकर. देगलुर तालुक्यात मरखेल, हाणेगाव. किनवट तालुक्यात किनवट, इस्लापुर, शिवणी, बोधडी. उमरी तालुक्यात  उमरी तर नायगाव  तालुक्यात बरबडा ही मंडळे आहेत.   

आंबा फळपिकासाठी अर्धापुर तालुक्यात दाभड, पाळेगाव. कंधार तालुक्यात कंधार, मुखेड तालुक्यात मुक्रामाबाद.  तर मोसंबी फळपिकासाठी अर्धापुर तालुक्यात मालेगव. नांदेड तालुक्यात लिंबगाव, विष्णुपुरी तर मुदखेड तालुक्यात बारड या अधिसुचित महसूल मंडळाचा यात समावेश आहे. 

प्रधानमंत्री फसल बिमा योजना हवामानावर आधारित फळपिक विमा आंबिया बहारमध्ये वरील अंतिम दिनांकापुर्वी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी व नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले आहे.

0000

 283 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

130 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- शनिवार 10 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 283 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 130 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 44 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 86 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 342 अहवालापैकी  1 हजार 166 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 300 एवढी झाली असून यातील  14  हजार 192 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 551 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 46 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवार 9 ऑक्टोंबर रोजी वाजेगाव नांदेड येथील 45 वर्षाच्या एका पुरुषाचा, कंधार येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, शिवाजी चौक माहूर येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा, शनिवार 10 ऑक्टोंबर रोजी बाबानगर नांदेड येथील 38 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 452 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 5, बिलोली कोविड केंअर सेंटर 1, उमरी कोविड केंअर सेंटर 10, हदगाव कोविड केंअर सेंटर 5, कंधार कोविड केंअर सेंटर 2, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 9, मुखेड कोविड केंअर सेंटर 9, खाजगी रुग्णालय 21, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 9,  एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 188, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 3, नायगाव कोविड केंअर सेंटर 4,किनवट कोविड केंअर सेंटर 5, लोहा कोविड केंअर सेंटर 3, मुदखेड कोविड केंअर सेंटर 5, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 4 असे 283 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 84.76 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 27, भोकर तालुक्यात 3,  किनवट 1, नायगाव 2, कंधार 1, हिंगोली 4, नांदेड ग्रामीण 2, मुदखेड 1, देगलूर 1, मुखेड 1, परभणी 1 असे एकुण 44 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 31, लोहा तालुक्यात 6, माहूर 4,  भोकर 3, उमरी 1, अर्धापूर 1, मुखेड 18, धर्माबाद 1, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड 3, देगलूर 1, कंधार 4, बिलोली 3, नायगाव 3, हिंगोली 2, परभणी 1 असे एकूण 86 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 551 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 151, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 558, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 61, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड नवी इमारत येथे 49, आयुर्वेदिक शासकीय महा.कोविड रुग्णालय सेंटर 11, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 46, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 29, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 69,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 11, लोहा कोविड केअर सेंटर येथे 29, हदगाव कोविड केअर सेंटर 29, भोकर कोविड केअर सेंटर 27,  बारड कोविड केअर सेंटर 4, मुदखेड कोविड केअर सेटर 10, माहूर कोविड केअर सेंटर 25, किनवट कोविड केअर सेंटर येथे 21, धर्माबाद कोविड केअर सेंटर 33, उमरी कोविड केअर सेंटर 79, कंधार कोविड केअर सेंटर येथे 20, अर्धापूर कोविड केअर सेंटर 58, खाजगी रुग्णालयात दाखल 222, लातूर येथे संदर्भित 3, निजामाबाद येथे संदर्भित 4, आदिलाबाद येथे संदर्भित 2 झाले आहेत. 

शनिवार 10 ऑक्टोंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 62, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 48, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 56 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 92 हजार 216,

निगेटिव्ह स्वॅब- 71 हजार 558,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 300,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 14 हजार 192,

एकूण मृत्यू संख्या- 452,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 84.76

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-25,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 611, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 551,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 46.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

0000


राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...