Wednesday, September 20, 2017

प. पू. मातासाहेब देवांजी जन्म शताब्दी
सोहळा उत्साहात साजरा करावा
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 20 :- प. पू. मातासाहेब देवांजी यांची 336 वी जन्म शताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
मुदखेड तालुक्यातील गुरुद्वारा मुगट येथे प. पू. मातासाहेब देवांजी यांची 336 वी जन्म शताब्दी सोहळा सोमवार 2 ते बुधवार 4 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत साजरा होणार आहे. याची पूर्व तयारीसाठी गुरुद्वारा मुगट येथे झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी संतबाबा बलविंदर सिंघ कारसेवावाले, मुगट येथील मातासाहेब देवांजी गुरुद्वाराचे प्रमुख श्री जत्थेदार बाबा प्रेमसिंघजी निंहगसिंघजी, नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगई, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्याच्या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळाली आहे. राज्य व राज्याबाहेरील भाविक, भक्त मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी येतील. त्यांच्यासाठी सर्व सुविधा पुरवणे आवश्यक आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करुन सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. तसेच 24 तास विद्युत पुरवठा, स्वच्छता, दूरसंचार, बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य सुविधांबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपआपल्या विभागाने दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडाव्यात अशा सूचना करुन श्री. डोंगरे यांनी हा सोहळा शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी संतबाबा बलविंदर सिंघ यांनी या सोहळ्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याने धन्यवाद मानले. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी या सोहळ्याच्या कालावधीत विविध विभागाने करावयाच्या कामांची माहिती दिली. दिलेल्या सूचनेनुसार संबंधीत विभागाने आपली कामे करावीत, असे सांगितले. तर सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगई यांनी सचखंड गुरुद्वाराच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगून सर्वांचे आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे  यांनी मुगट येथील गुरुद्वारा परिसराची पाहणी केली. याप्रसंगी महावितरण, पशुसंवर्धन, पोलीस, पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000000
गोदावरी नदीकाठच्या गावांना
पूर परिस्थितीबाबत सतर्कतेच्या सूचना
नांदेड दि. 20 :- जायकवाडी धरणातील अतिरिक्‍त जलसाठयाचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्याची शक्‍यता असून या विसर्गामुळे नदीकाठच्‍या गावांना व तेथील स्‍थानीक प्रशासकीय यंत्रणेला पूर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात येत आहेत. नागरीकांनी कुठल्‍याही प्रकारच्‍या अफवावर विश्‍वास न ठेवता सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जायकवाडी धरणाची पाणी पातळी मंगळवार 19 सप्टेंबर रोजी 88.10 टक्‍के क्षमतेने भरली आहे. उर्ध्‍व भागातील धरणांमध्‍ये जवळपास 100 टक्‍के पाणीसाठा झाला आहे. पुढील काळात केंव्‍हाही अतिरिक्‍त जलसाठयाचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्याची शक्‍यता निर्माण होऊ शकते आणि या विसर्गामुळे धरणाखालील भागातील गोदाकाठच्‍या गावांना आगामी काळात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. वेळोवेळी होणाऱ्या जलसाठा  विसर्गामुळे प्राधिकार क्षेत्रील नदीकाठच्‍या गावांना व तेथील स्‍थानीक प्रशासकीय यंत्रणेला पूर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात येत आहेत.  

000000
दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात व शहरात शनिवार 30 सप्टेंबर 2017 रोजी दसरा व रविवार 1 ऑक्टोंबर रोजी दुर्गादेवी, शारदादेवी विसर्जन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश काढले आहेत.
या आदेशात म्हटले आहे, शनिवार 30 सप्टेंबर रोजी  दसरा असल्याने जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या व रविवार 1 ऑक्टोंबर रोजी दुर्गादेवी, शारदादेवी विसर्जन निमित्त नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष). एफएल-4, एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे. 

00000
रत्नेश्वरी गडावर नवरात्र महोत्सवाची तयारी उत्साहात सुरु आहे. वडेपूरी डेरला परिसर हिरवाईने नटला आहे ( छाया :- विजय होकर्णे नांदेड )






Tuesday, September 19, 2017

आंतरशालेय राज्यस्तरीय टेबल टेनिस
क्रीडा स्पर्धेस नांदेड येथे शानदार प्रारंभ
नांदेड दि. 19 :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे आयोजीत आंतर शालेय राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन दिनांक 19 ते 21 सप्टेंबर 2017 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांच्या हस्ते  आज संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त गणेश देशमुख हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कारार्थी रामलू पारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, पुणे येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक तय्यद असद अली, पुणे टेबल टेनिस क्रीडा मार्गदर्शक निरज होनप, संघटना प्रतिनिधी अश्विन बोरीकर, नांदेड राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल बंदल, मुंबई साई क्रीडा मार्गदर्शक श्रीमती राजश्री म्हेत्रे, रायगड शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय कडू, हिंगोली राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन पुरी, नागपूर एनआयएस मार्गदर्शक अजय कांबळे, परभणी संघटना प्रतिनिधी गणेश माळवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर यांनी मानले.
            या स्पर्धेसाठी राज्यातून 265 खेळाडू मुले-मुली, 18 संघ व्यवस्थापक (पुरुष व महिला), निवड चाचणीसाठी 144 मुले-मुली, पंच-10 व स्वयंसेवक-25 असे एकुण 462 उपस्थित झाले असून आज झालेल्या सामन्याचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
14 वर्षे मुले- मुंबई विरुध्द लातूर दरम्यान 3-0 सेट मध्ये मुंबई विजयी, पुणे वि. नागपूर दरम्यान 3-0 सेट मध्ये पुणे विजयी, कोल्हापूर वि. अमरावती दरम्यान 3-2 सेट मध्ये कोल्हापूर विजयी, औरंगाबाद वि.नाशिक दरम्यान 3-2 सेट मध्ये औरंगाबाद विजयी.
14 वर्षे मुली- मुंबई विरुध्द औरंगाबाद दरम्यान 3-0 सेट मध्ये मुंबई विजयी, पुणे वि.नाशिक दरम्यान 3-0 सेट मध्ये पुणे विजयी, क्रीडा प्रबोधीनी वि.कोल्हापूर दरम्यान 3-0 सेट मध्ये क्रीडा प्रबोधीनी विजयी.
17 वर्षे मुले- नाशिक विरुध्द औरंगाबाद दरम्यान 3-2 सेट मध्ये नाशिक विजयी, लातूर विरुध्द नागपूर दरम्यान 3-1 सेट मध्ये लातूर विजयी,
17 वर्षे मुली- नागपूर विरुध्द लातूर दरम्यान 3-1 सेट मध्ये नागपूर विजयी, नाशिक वि.कोल्हापूर दरम्यान 3-2 सेट मध्ये नाशिक विजयी..
19 वर्षे मुले- औरंगाबाद विरुध्द कोल्हापूर दरम्यान 3-2 सेट मध्ये औरंगाबाद विजयी, पुणे वि.अमरावती दरम्यान 3-0 सेट मध्ये पुणे विजयी,
19 वर्षे मुली- क्रीडा प्रबोधिनी विरुध्द लातूर दरम्यान 3-1 सेट मध्ये क्रीडा प्रबोधिनी विजयी, मुंबई वि.नागपूर दरम्यान 3-1 सेट मध्ये मुंबई विजयी, कोल्हापूर वि. औरंगाबाद दरम्यान 3-0 सेट मध्ये कोल्हापूर विजयी
            या स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या स्पर्धेकरीता  कार्यालयातील क्रीडा अधिकारी सय्यद साजीद, मारोती सोनकांबळे, क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, वरिष्ठ लिपक आनंद गायकवाड, कनिष्ठ लिपीक आनंद सुरेकर, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, धम्मदीप कांबळे, मोहन पवार, मनोहर खंदारे, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, हनमंत नरवाडे, लक्ष्मीकांत रोठे आदी सहकार्य करीत आहेत.

000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 19 :- जिल्ह्यात रविवार 1 ऑक्टोंबर 2017 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  

000000
शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बँकेच्या कर्जाची
माहिती ऑनलाईन अर्जात अपडेट करावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 19 :- शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बँकेकडून कर्ज घेतले असेल व एकाच बँकेच्या कर्जाचा ऑनलाईन अर्जात उल्लेख केला असेल तर अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जमाफी अर्जामध्ये दुरुस्ती करुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सर्वच बँकांच्या कर्जाची आणि बचत खात्याची माहिती सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्जामध्ये अपडेट करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान योजना 2017 अंतर्गत  30 जुन 2016 अखेर थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजार पर्यंत कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2015-16 मध्ये घेतलेल्या कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये मर्यादेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. या योजनेंतर्गत एका शेतकरी कुटुंबास महत्तम  1 लाख 50 हजार रुपये मर्यादेपर्यंत लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्‍टेबर 2017 पर्यंत आहे.
शेतीसाठी कर्ज घेत असताना काही शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत किंवा ग्रामीण बँकेकडून व सेवा सहकारी संस्थेमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. परंतु ऑनलाईन अर्ज भरताना केवळ एकाच बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा उल्लेख केला आहे. अशा सभासदांनी दोन्ही बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा उल्लेख त्यांच्या अर्जात करणे आवश्यक आहे. अशा सभासदांनी सर्व बॅकांकडून घेतलेल्या कर्जाच्या माहितीचे एकत्रीकरण वरिष्ठ पातळीवर संगणकाद्वारे होणार आहे. त्यामुळे अशा सभासदांनी अपुर्ण माहिती दिली असल्यामुळे त्यांचे कर्जमाफीचे किंवा प्रोत्साहनपर अनुदानाचे अर्ज तात्पुरते अपात्र ठरविले जाणार आहेत. सर्व शेतकरी बांधवानी त्यांनी सर्व बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती ऑनलाईन अर्जात नमूद करावी. तसेच त्यांचे कर्जखाते त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधीत बँक शाखेस व गटसचिवास आधार कार्डची प्रत दयावी जेणे करून या योजनेतील लाभापासून ते अपात्र ठरणार नाहीत.
            तांत्रिक किंवा इतर कोणत्याही कारणामुळे एकही शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी व आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव संबंधित तालुक्याचे उप/ सहायक निबंधक, सहकारी संस्था हे आहेत. समन्वय समितीच्यावतीने योजनेची अमंलबजावणी आपल्या तालुक्यात करणे व त्यासाठी आवश्यक असल्यास तालुकास्तरीय विविध यंत्रणांचे सहकार्य मिळविणे, योजनेतील अर्जदारांची पोर्टलवरील यादी प्रिंट करुन यादीचे चावडी वाचन करुन प्राथमिक पडताळणी करणे, पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त आहेत किंवा कसे ? याची शहानिशा गावपातळीवर करणे. यादीतील संबंधित अर्जदारांच्या नावासमोर त्यांच्या पात्र / अपात्रतेसंबंधी संक्षिप्त शेरे अथवा सुस्पष्ट अभिप्राय नोंदविणे आदी कामे तालुका स्तरीय समितीकडून केली जाणार आहेत. 
            कर्जमाफीस पात्र होण्यासाठी बँकेकडे आधार कार्ड व केवायसी कागदपत्रे देणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडे आधार कार्ड दिलेले नाही त्यांनी त्वरित आधार कार्डची प्रत बँकेकडे जमा करावी. शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेशिवाय इतर बँकांकडून कर्ज घेतले असले तरी, त्यांना एकूण 1 लाख 50  हजार रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी सांगितले.

00000

  वृत्त क्रमांक दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा! • चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्...