Thursday, September 14, 2017

कृषि योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठी
 प्रस्ताव सादर करण्यास 25 सप्टेंबर मुदत
नांदेड दि. 14 :- जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत सन 2017-18 या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसुचीत जाती, नवबौध्द शेतकऱ्यांना तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील योजनेंतर्गत अनु. जमातीच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याकरीता लाभार्थी निवडीसाठी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सोमवार 25 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
लाभार्थी निवडीचे अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील. लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकरी असला पाहिजे. शेतक-यांकडे सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. शेतक-यांकडे सक्षम प्राधिका-याने दिलेले जात वैधता प्रमाण पत्र असले पाहिजे (ओटीएसपी व टिएसपी योजनेकरिता) शेतक-याच्या  नावे जमीन धारणेचा 7/ 12 दाखला व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. शेतक-याच्या नावे किमान 0.40 हेक्टर  व कमाल 6.0 हेक्टर मर्यादेपर्यंत शेत जमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांस प्रथम प्राधान्य. दारिद्रय रेषेखालील नसलेले अनु.जाती / नवबौध्द / शेतक-यांचे सर्व मार्गानी मिळणारे सन 2016-17 या वर्षाचे  वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसेल तरच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.  दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) यादीत अंतर्भूत  शेतक-यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट राहणार नाही. परंतु ज्यांचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयाचे मर्यादीत आहे. अशा शेतक-यांनी सबंधीत तहसीलदार यांचेकडून मागील वर्षाचे उत्पन्नाचा अदयावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेशी संपर्क  साधावा.
 सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणात अनु.जातीच्या लोकसंख्येवर व अनु.जमाती च्या लोकसंखेवर आधारीत लाभार्थी निवडीचे उददीष्ट दर्शविणारा तक्ता 
तालुका
सन 2017-18 साठी
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने अंतर्गत अनुसूचीत जाती / नवबौध्द शेतकरी  लाभार्थी निवडीचे उद्दीष्ट
सन 2017-18 साठी आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील (ओटीएसपी) योजने अंतर्गत लाभार्थी निवडीचे उद्दीष्ट
सन 2017-18 साठी आदिवासी उपयोजना क्षेत्राअंतर्गत  (टीएसपी) योजने अंतर्गत लाभार्थी निवडीचे उद्दीष्ट
नांदेड
227
03
--
मुदखेड
31
02
--
अर्धापूर
31
02
--
बिलोली
58
03
--
धर्माबाद
29
03
--
नायगांव
64                                      
02
--
मुखेड
                    102
04
--
कंधार
82
02
--
लोहा
 65
02
--
हदगांव
88
06
--
हिमायतनगर
24
04
--
भोकर
34
05
--
उमरी
32
02
--
देगलुर
81
03
--
किनवट
38
14
62
माहुर
14
03
13
एकुण
1000
60
75
00000


नवरात्र उत्सवात पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 14 :- जिल्ह्यात 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत नवरात्र उत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर दुर्गादेवी, शारदादेवीची स्थापना व विसर्जन करण्यात येते. त्याकरीता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणुन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2017 च्या मध्यरात्रीपर्यंत वरील कलमान्वये पुढील अधिकार प्रदान केला आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी वर्तवणूक किंवा वागणुक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी, उपासनेच्यावेळी, कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33, 35, 37 ते 40, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिर सभा, मोर्चे, मिरवणुक, निर्दशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्वपरवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावेत. सदर जाहीर सभा, मिरवणुक, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये.
हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जारी केले आहेत.

00000

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...