कृषि योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठी
प्रस्ताव सादर
करण्यास 25 सप्टेंबर मुदत
नांदेड दि. 14 :- जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत सन 2017-18 या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन
योजनेंतर्गत अनुसुचीत जाती, नवबौध्द शेतकऱ्यांना तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील योजनेंतर्गत अनु. जमातीच्या
शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याकरीता लाभार्थी निवडीसाठी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सोमवार 25 सप्टेंबर 2017 पर्यंत
सादर करावेत, असे आवाहन जिल्हा
परिषदेचे कृषि विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
लाभार्थी निवडीचे अटी व शर्ती
पुढील प्रमाणे राहतील. लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकरी असला पाहिजे. शेतक-यांकडे सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. शेतक-यांकडे सक्षम प्राधिका-याने दिलेले जात वैधता प्रमाण पत्र असले पाहिजे (ओटीएसपी व टिएसपी योजनेकरिता)
शेतक-याच्या नावे जमीन धारणेचा 7/ 12 दाखला व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
शेतक-याच्या नावे किमान 0.40 हेक्टर
व कमाल 6.0 हेक्टर मर्यादेपर्यंत शेत जमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांस प्रथम प्राधान्य.
दारिद्रय रेषेखालील नसलेले अनु.जाती / नवबौध्द
/ शेतक-यांचे सर्व मार्गानी मिळणारे सन 2016-17 या वर्षाचे
वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसेल तरच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) यादीत अंतर्भूत शेतक-यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट राहणार नाही. परंतु ज्यांचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयाचे मर्यादीत आहे. अशा शेतक-यांनी सबंधीत तहसीलदार यांचेकडून मागील वर्षाचे उत्पन्नाचा अदयावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेशी संपर्क
साधावा.
सन 2011 च्या जनगणनेनुसार
तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणात
अनु.जातीच्या लोकसंख्येवर व अनु.जमाती
च्या लोकसंखेवर आधारीत लाभार्थी
निवडीचे उददीष्ट दर्शविणारा तक्ता
तालुका
|
सन 2017-18 साठी
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन
योजने अंतर्गत अनुसूचीत जाती
/ नवबौध्द शेतकरी लाभार्थी निवडीचे उद्दीष्ट
|
सन 2017-18 साठी
आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील (ओटीएसपी) योजने
अंतर्गत लाभार्थी निवडीचे उद्दीष्ट
|
सन 2017-18 साठी
आदिवासी उपयोजना क्षेत्राअंतर्गत (टीएसपी) योजने
अंतर्गत लाभार्थी निवडीचे उद्दीष्ट
|
नांदेड
|
227
|
03
|
--
|
मुदखेड
|
31
|
02
|
--
|
अर्धापूर
|
31
|
02
|
--
|
बिलोली
|
58
|
03
|
--
|
धर्माबाद
|
29
|
03
|
--
|
नायगांव
|
64
|
02
|
--
|
मुखेड
|
102
|
04
|
--
|
कंधार
|
82
|
02
|
--
|
लोहा
|
65
|
02
|
--
|
हदगांव
|
88
|
06
|
--
|
हिमायतनगर
|
24
|
04
|
--
|
भोकर
|
34
|
05
|
--
|
उमरी
|
32
|
02
|
--
|
देगलुर
|
81
|
03
|
--
|
किनवट
|
38
|
14
|
62
|
माहुर
|
14
|
03
|
13
|
एकुण
|
1000
|
60
|
75
|
00000
No comments:
Post a Comment