वृत्त क्र. 1110
देगलूरसाठी नगरेश्वर मंदिर मंगल कार्यालयात निवासी व्यवस्था
नांदेड दि. 17 नोव्हेंबर :- लोकसभा पोटनिवडणूक व देगलूर विधानसभा निवडणूक कामासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी नगरेश्वर मंदिर व मंगल कार्यालय, देगलूर याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्याच्या व्यवस्थेसाठी पुढीलप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देगलूर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार बालाजी सुरनर यांचा मोबाईल क्रमांक 9881182846 आहे. मंडळ अधिकारी जी.पी. पदकोंडे यांचा मोबाईल क्रमांक 9657097098 असून देगलूर सज्जाचे तलाठी टी.जी. रातोळीकर असून त्यांचा मोबाईल क्रमांक 8007929262 यांची नियुक्ती केली आहे. तरी मतदान प्रक्रीयेसाठी 18 नोव्हेंबर रोजी येणाऱ्या मुक्कामी कर्मचाऱ्यांनी यांच्याशी संपर्क साधावा, असे देगलूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment