वृत्त क्र. 1109
भोकर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च निरीक्षकानी केली तृतीय तपासणी
नांदेड, दि. 17 नोव्हेंबर :- भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी 16 नोव्हेंबर रोजी केली. यावेळी काही उमेदवार तर काही उमेदवारांचे प्रतिनिधी हजर होते.
गुजरात कॅडरचे 2009 बॅचचे आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे हे सुरत येथे आयकर विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्याच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव , भोकर, नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. मयंक पांडे (आयआरएस) व त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना हे आहेत. खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी 16 नोव्हेंबर रोजी उमेदवाराच्या खर्चाची तृतीय तपासणी करुन मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोकरचे तहसिलदार विनोद गुंडमवार, सहायक खर्च निरीक्षक मारोती फुलारी, खर्च विभागाचे पथक प्रमुख पी. व्ही. गोविंदवार, दिपक गवलवाड व बालाजी वाकडे यांची उपस्थिती होती.
0000
No comments:
Post a Comment