Monday, April 22, 2024
वृत्त क्र. 374
उन्हाला घाबरु नका, मतदानासाठी बाहेर पडा !
प्रतिक्षालयासोबतच वैद्यकीय व्यवस्थाही मतदाराच्या दिमतीला
आरोग्य विभाग सज्ज प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोचार पेटी
नांदेड दि. 22 एप्रिल :- नांदेड लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान होत आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर गेले आहे. यामुळे अनेक मतदार उन्हात बाहेर पडण्याचे टाळून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आता घाबरण्याची गरज नसून आरोग्य विभागाने प्रत्येक केंद्रावर प्रथमोचार पेटी ठेवली आहे. याशिवाय एखाद्याला जास्त गरज भासल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात दाखल करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने घाबरून न जाता 26 एप्रिलला मतदानासाठी घराबाहेर पडावे व मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
एप्रिल महिना अर्धा पालटला असून जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. 26 एप्रिलला मतदानाच्या दिवशी मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांच्या आरोग्याची प्रशासनाकडून काळजी घेतली जाणार आहे. आरोग्य विभागाच्यावतीने प्रत्येक मतदार केंद्रावर प्रथमोपचार पेटीची सोय केली आहे. तसेच मतदानादरम्यान मतदारांची प्रकृती खालावली आणि त्यांना उपचारासाठी आरोग्य संस्थेत आणले तर शासनाच्या प्रत्येक आरोग्य संस्थेत मतदानाच्या दिवशी डॉक्टर कार्यरत राहणार असून ते मतदारांच्या प्रकृतीची काळजी घेणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार किट ठेवण्यात आली आहे. पॅरासिटामोट, ओआरएस आणि प्रथमोपचारासाठी लागणारे सर्व साहित्य असलेली किट तयार करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्राला ही किट वाटप करण्यात आली आहे. तरी सर्व मतदारांनी उन्हाला न घाबरता मतदानासाठी बाहेर पडावे व मतदान करावे. मतदारांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले.
तसेच नागरिकांनी तीव्र उन्हापासून बचाव होण्यासाठी वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळच्या वेळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावेत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. अधून मधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी. अस्वस्थ वाटल्यास ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 373
शेकडोंच्या समुदायाने केला मतदानाचा संकल्प ;नांदेडच्या परेड मैदानात रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी
गीत, गायन,पोवाडा, पथनाटय, ओव्या, रिल्समधून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन
नांदेड दि. २२ एप्रिल : 26 एप्रिल रोजी नांदेड येथे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने आज विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला साद घातली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांने किमान 50 मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा संकल्प आज शेकोडोंच्या संख्येने, उपस्थित कर्मचाऱ्यांनी नांदेड पोलीस परेड ग्राउंडवर केला.
सोमवारची सकाळ पोलीस परेड ग्राउंडवर नांदेड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या हजारोच्या एकत्रिकरणाने उल्हासित झाली होती. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, बचत गटांचे सदस्य ,शाळकरी विद्यार्थ्यांच्या जोश पूर्ण सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर मोठ्या संख्येने दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनात व महानगरामध्ये मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आज या दोघांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद व मनपा कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
स्वीपच्या सर्वात मोठ्या उपस्थितीच्या या कार्यक्रमांमध्ये नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी आलेले खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगिड, खर्च निरीक्षक मग्पेन भुटिया यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माधव सलगर यांच्यासह जिल्हा परिषदेचे, मनपाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लेझीम पथकाच्या स्वागताने झाली. त्यानंतर मतदान जनजागृती पोवाडा सादर करण्यात आला. राज्याच्या सदिच्छा दूत डॉ. सानवी जेठवाणी यांनी यावेळी उपस्थिततांपुढे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर हदगाव तालुक्यातील उमरी येथील विद्यार्थ्यांनी अप्रतिम पथनाट्य सादर केली. मतदान वाढविण्यामध्ये आपले योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून तालुकास्तरावरून निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यांची भाषणे लक्षवेधी ठरली. एमजीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नृत्य यासोबतच एनसीसी, स्काऊट -गाईडच्या विद्यार्थ्यांचे पथसंचलन बचत गटांच्या महिलांसाठी व अंगणवाडी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन, तसेच स्वीप उपक्रमांतर्गत मतदान वाढीसाठी बनविण्यात आलेले स्लोगन, रिल्स, शॉर्ट फिल्म, ओव्या, स्वीप प्रश्नमंजुषा आधीच स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,सीईओ मीनल करनवाल यांनी यावेळी बचत गट व अंगणवाडी महिलांनी लावलेल्या स्टॉलला भेटी दिल्या. तसेच त्यांच्या स्पर्धेनंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. प्रत्येक गावातून व वार्डातून मोठ्या संख्येने मतदान होण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली. यावेळी मैदानावर साकारलेली संस्कार भारतीची प्रबोधनात्मक रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सान्वी जेठवानी व श्री. प्रलोभ कुलकर्णी यांनी केले.
शहरी लोकसंख्या मागे राहू नये
महानगरपालिकेचे कर्मचारी आयोजनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरवेळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान होते. मात्र शहरी मतदान कमी होत असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. नांदेडमध्ये प्रत्येक नागरिकाने याची नोंद घ्यावी. गावात राहणाऱ्या माणसाला मतदानाबाबत जी जाणीव आहे तीच जाणीव ठेवून शहरी भागातही मतदान मोठ्या संख्येने व्हावे, अशी अपेक्षा यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांनी व्यक्त केली आहे.
0000
Sunday, April 21, 2024
वृत्त क्र. 372
75 टक्क्यापेक्षा जास्त मतदान टक्केवारी साध्य करणा-या केंद्राचा होणार सन्मान
·सर्वोकृष्ट कामगिरी करणा-या गाव, वार्ड, केंद्र व अधिकारी कर्मचारी सन्मानित होतील
नांदेड, दि. 21 एप्रिलः- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात स्वीप अंतर्गत मतदार जागृतीचे विविध उपक्रम सुरु आहेत. या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्वोकृष्ट कामगिरी व उत्कृष्ट मतदान टक्केवारी करणा-या गावांचा, वार्डचा त्याचप्रमाणे मतदानासाठी नियुक्त सर्वस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सर्वोकृष्ट मतदान टक्केवारी असलेल्या तीन मतदान केंद्राचा सन्मान जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. यामध्ये बिलओ, मतदान कर्मचारी, मतदान केंद्रावरील पोलीस कर्मचारी , झोनल अधिकारी, झोनल पोलीस अधिकारी, बिलओ सुपरवायझर, त्या गावातील अथवा वार्डमधील गावस्तरीय व वार्डस्तरीय अधिकारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच सर्वोकृष्ट कामगिरी करणारे मतदान केंद्र ज्या ठिकाणी स्थित आहे. त्या गावाच्या ग्रामसभेचा, वार्डच्या वार्ड सभेचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच 75 टक्के पेक्षा जास्त मतदान टक्केवारी साध्य करणा-या मतदान केंद्राचा प्रोत्साहनपर सत्कार करण्यात येईल. त्यामध्ये तेथील बीएलओ, मतदान कर्मचारी, पोलीस कर्मचारी , झोनल अधिकारी, झोनल पोलीस अधिकारी, बीएलओ पर्यवेक्षक तसेच स्थानिक ग्रामसभा,वार्डसभा यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वोकृष्ट मतदान टक्केवारी साध्य करणा-या तीन मतदान केंद्राचा विशेष पारितोषिक देवून सन्मान करण्यात येणार आहे, या संदर्भातील एक पत्र जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहे.
००००
वृत्त क्र. 371
नवमतदार व चिमुकल्या खेळांडूनी केले नांदेडकरांना मतदान करण्याचे आवाहन
· जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वॉकथॉन रॅलीस हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ
नांदेड, दि. 21 एप्रिलः- जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने रविवारी सकाळी 7.30 वाजता मतदान जनजागृतीसाठी "वॉकथॉन" रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते "मी मतदान करणारच" या सेल्फी पॉईंटचे फित कापून व सेल्फी काढून शुभारंभ करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते वॉकथॉन रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, विस्तार अधिकारी रुस्तुम आडे आदींची उपस्थिती होती. या वॉकथॉन रॅलीस ए एम सी गुलाम सादिक, डि एम सी कारभारी दिवेकर, डी वाय ई संघरत्न सोनसळे, क्षेत्रीय अधिकारी रावन सोनसळे, रमेश चवरे, संजय जाधव, निलावती डावरे, सी ए ओ तुकाराम भिसे, सीए एफओ जनार्धन पकवाणे, माता गुजरीजी विसावा उद्यानचे अधिक्षक बेग, सहाय्यक आयुक्त सुधीर हिंगोले, डॉ. बडी, डॉ. बिसेन, राजेश फटाळे (सर्व मनपा कार्यालय), क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, श्रीमती शिवकांता देशमुख, चंद्रप्रकाश होनवडजकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, श्रीमती सारिका आचणे, डॉ. राजेश पावडे, प्रलोभ कुलकर्णी, रवी ढगे, साईनाथ चिद्रावार, साईराज मुदीराज हे सर्व स्वीप सदस्य आदी मान्यवर व नांदेड जिल्हयातील विविध एकविध खेळ संघटनेचे खेळाडू (मुले-मुली) व पदाधिकारी विविध शासकीय- निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी/ कर्मचारी विविध पोलिस भरती अकॅडमीचे मुले-मुली, प्रशिक्षणार्थी आदीनी उपस्थित राहुन उर्स्फूत प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी मानले. या वॉकथॉन रॅलीस डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परीसर येथून सुरुवात होऊन स्टेडीयम मुख्यद्वार मार्गे आयटीएम कॉलेज- महात्मा फुले पुतळा आयटीआय चौक-मार्गे शिवाजीनगर, बसस्टॅड- वजिराबाद चौक, छ. शिवाजी महाराज पुतळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काढण्यात आली. शेवटी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मतदानाची प्रतिज्ञा नवमतदार खेळाडूंना देण्यात आली व रॅलीचा समारोप करण्यात आला. ही वॉकथॉन रॅली जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली होती. यासाठी क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, श्रीमती शिवकांता देशमुख, चंद्रप्रकाश होनवडजकर, वरिष्ठलिपीक संतोष कनकावार, संजय चव्हाण तसेच हनमंत नरवाडे, आकाश भोयर, बंटी सोनसळे, शेख इक्रम, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळा, यश कांबळे आदीनी सहकार्य केले.
0000
Saturday, April 20, 2024
वृत्त क्र. 370
मतदानाला 5 दिवस बाकी ;मोबाईलचा जपून
वापर करा !
नांदेडमध्ये पुन्हा एक गुन्हा दाखल ;
आतापर्यंत 6 गुन्हे दाखल
पोलीस प्रशासनाने तपासली साडेचार हजारावर
अकाउंट
मॉनिटरींगची संख्या वाढली ;सोशल मिडियावर
करडी नजर
नांदेड दि. 20 एप्रिलः नांदेड लोकसभा
निवडणुकीसाठी अवघे पाच दिवस बाकी असून सोशल मीडियावरील अकाउंट तपासण्याची गती पोलिसांनी
वाढविली आहे. आतापर्यंत साडे चार हजारावर अकाऊंट तपासण्यात आले आहे.सामाजिक स्वास्थ
बिघडवणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची
बदनामी,विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणे अशा पद्धतीच्या पोस्ट
माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या सोशल मिडिया सेलकडून तपासल्या जात आहे. काल
या संदर्भात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 5 आरोपींवर गुन्हा दाखल
करण्यात आला होता. काल आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
धार्मिक ग्रंथ व महिलांविरुद्ध आक्षेपार्ह
पोस्ट टाकणे, विशिष्ट समाजाला धमकावणे, गर्भित इशारे देणे,विशिष्ट धर्माविरुद्ध गैरसमज
पसरविणे,तेढ निर्माण करणारे, भीतीदायक फोटो प्रसारित करणे,लोकांच्या भावना भडकतील,
ठेच पोहचतील अशा पद्धतीची भाषा वापरणे, निवडणूक काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे,
अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडिया सेल लक्ष ठेवून आहे.
काल नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.न.141/24 Sec.295(A),505(1)(C),505 (2) भादवी
गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी हिमायतनगर, मुखेड ,माहूर व अर्धापूर ( अर्धापूरमध्ये
एकूण दोन गुन्हे ) या ठिकाणी समाज माध्यमांवरून तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्याबद्दल
गुन्हे दाखल झाले होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आता हा सहावा गुन्हा दाखल झाला
आहे.
उमेदवारांचे खाते तपासल्या जाते
निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे
सर्व फेसबुक व अन्य समाज माध्यमावरील अकाउंट
प्रतिज्ञापत्रात सादर केले आहे. त्यांच्या फेसबुक व अन्य सोशल अकाउंटवरून जाहिरात करताना
त्यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा काही
पोस्ट परवानगी न घेता आढळल्यास त्याचा सर्व खर्च उमेदवाराच्या खर्चाच्या तपशीलात जमा
केला जाणार आहे.
तसेच या निर्धारित सोशल मीडिया अकाउंट
वरून कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होता कामा नये. त्यामुळे उमेदवारांनी
देखील आपले सोशल अकाउंट हँडल करणाऱ्यांना योग्य सूचना देणे आवश्यक आहे.
संपर्क साधा
आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 8308274100 हा नंबर दिला असून यावर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा! • चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...
.jpeg)

.jpeg)

.jpeg)

.jpeg)




.jpeg)

.jpeg)




