नांदेड जिल्ह्यात 212 व्यक्ती
कोरोना बाधित
5 जणाचा मागील दोन दिवसात मृत्यू
225 कोरोना
बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात
आज प्राप्त झालेल्या 3 हजार 115 अहवालापैकी 212 अहवाल
कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 97 तर
अँटिजेन तपासणीद्वारे 115 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण
बाधितांची संख्या 88 हजार 626 एवढी झाली असून यातील 84 हजार 724 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली
आहे. आजच्या घडीला 1 हजार 585 रुग्ण उपचार घेत असून 61 बाधितांची
प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी
सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य
जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक
जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी
केले आहे.
दिनांक 25 मे 2021 रोजी भगवती कोविड रुग्णालयात तुळशीरामनगर
नांदेड येथील 63 वर्षाची महिला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे हडको
नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, हदगाव येथील 15 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय
कोविड हॉस्पिटल येथे पिरपुऱ्हाननगर नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष तर 26 मे रोजी देगलूर
कोविड रुग्णालयात मुखेड तालुक्यातील उंदरी येथील 70 वर्षाची महिलेचा उपचारा
दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 868 एवढी आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड
मनपा 45, धर्माबाद 3, लोहा 3, उमरी 5, नांदेड ग्रामीण 10, हदगाव 6, माहूर 5,
यवतमाळ 1, अर्धापूर 2, कंधार 2, मुदखेड 2, लातूर 1, बिलोली 1, किनवट 4, मुखेड 5,
परभणी 2 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 34, बिलोली 1, किनवट 4, मुखेड 8, औरंगाबाद 1, हिंगोली
2, नांदेड ग्रामीण 10,धर्माबाद 1, लोहा 9, नायगाव 1, लातूर 1, अर्धापूर 6, हदगाव
7, माहूर 9, उमरी 5, परभणी 1, भोकर 3, कंधार 8, मुदखेड 2, अहमदनगर 1, यवतमाळ 1 असे
एकूण 212 बाधित आढळले.
आज जिल्ह्यातील 225 कोरोना बाधितांना
औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
विष्णुपुरी नांदेड येथे 5, उमरी कोविड रुग्णालय 3, मुखेड
कोविड रुगणाय 8, अर्धापूर
तालुक्यांतर्गत 5, लोहा तालुक्यांतर्गत 5, खाजगी रुग्णालय 60, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 11, मुदखेड कोविड केअर
सेंटर 5, कंधार तालुक्यांतर्गत 7, नायगाव
तालुक्यांतर्गत 2, किनवट कोविड रुग्णालय 7, मनपाअंतर्गत
एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 68, बारड कोविड केअर सेंटर 2, हिमायतननगर
तालुक्यातर्गंत 29, धर्माबाद
कोविड केअर सेंटर 1, माहूर तालुक्यांतर्गत 7 या व्यक्तींना
रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज 1 हजार 585
कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
विष्णुपुरी 29, जिल्हा
रुग्णालय कोविड हॉस्पिटल 49, जिल्हा
रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 41, बारड कोविड केअर सेंटर 10, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 32, मुखेड
कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, देगलूर कोविड रुग्णालय 11, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 6, कंधार
कोविड केअर सेंटर 3, नायगाव
कोविड केअर सेंटर 6, उमरी कोविड केअर सेंटर 4, माहूर
कोविड केअर सेंटर 6, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 7, लोहा
कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 10, धर्माबाद कोविड केअर सेंटर 18, मुदखेड कोविड केअर सेंटर 23, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 8, बिलोली कोविड
केअर सेंटर 18, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, एनआरआय
कोविड केअर सेंटर 4, मांडवी कोविड केअर सेंटर 14, भक्ती
जंम्बो कोविड केअर सेंटर 5, नांदेड
मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 385, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 681, खाजगी
रुग्णालय 206
व्यक्ती उपचार घेत आहेत.
आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
विष्णुपूरी येथे 106, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 98, शासकीय
आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 90, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 35 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची
संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 24
हजार 665
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 25 हजार 356
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 88 हजार 626
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 84 हजार 724
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 868
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.59 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-20
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-193
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 585
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-61
00000