Saturday, November 30, 2019


हिब्बट, माळाकोळीतील भूगर्भातील आवाज
नैसर्गिक परिस्थितीत न घाबरता
सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
नांदेड, दि. 30 :- नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यात हिब्बट आणि लोहा तालुक्यात माळाकोळी येथे भूगर्भातील आवाज आणि भुकंपांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील भू-भौतिकी विभागाचे वरीष्ठ अॅसोसिएट प्रोफेसर डॉ. टी. विजय कुमार यांच्यासोबत नुकतीच चर्चा केली आहे.
यावेळी डॉ. विजय कुमार यांनी पावसाचे जास्त प्रमाण असल्यास भूगर्भात जमा होणारे पाणीसाठे आणि जमिनीतील फॉल्ट तथा प्लेटांचे घर्षण बेसॉल्ट खडक, अंतर्गत खनिज यांच्याशी संयुग होऊन मुक्त होणाऱ्या वायुमुळे हे आवाज निर्माण होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया असून अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी न घाबरता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जमिनीत होणाऱ्या आवाजांची नोंद ही भूकंपमापक यंत्रावर होत नसुन भूकंपाच्या तिव्रतेची नोंद होते, असे सांगितले.
हिब्बाट आणि माळाकोळी येथे जमीनीतुन ध्वनिक उत्सर्जन आणि भूकंपाच्या हालचाली वारंवार अनुभविण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासनाने वेळीच याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मंत्रालय मुंबई, भूकंप अन्वेषण केंद्र केंद्रीय पृथ्वी विज्ञान विभाग नवी दिल्ली आणि भारतीय भू-वैज्ञानिक सर्वेक्षण नागपुर यांना वेळोवेळी निदर्शनास आणुन दिले आहे, यावर संशोधन सुरु आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नुकतेच 25 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठातील भू-भौतिकी विभागाचे वरीष्ठ अॅसोसिएट प्रोफेसर डॉ. टि. विजय कुमार यांच्यासोबत एक तास चर्चा केली. नांदेड आणि सभोवतालचा प्रदेश हा सेस्मिक झोन- 2 या श्रेणीत येत असुन सोलापुर पासुन तेलंगना राज्यातील बोधनपर्यंत संपुर्ण भूगर्भाची स्कॅनिंग होत असल्याची आणि ठिकठिकाणी याचे केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
ग्रामीण भागातील अनेक घर कच्चे आणि पत्र्याचे असतात तसेच त्यावर मोठे लाकडाचे ओडके, खोड किंवा वजनदार दगड ठवले असतात ते अतिशय धोकादायक ठरतात. कारण भूकंपाच्यावेळी हे खाली पडुन मोठी जीवितहानी करतात. दोषपुर्ण बांधकाम हे भूकंपात फार जास्त धोकादायक ठरतात. भूकंपाच्यावेळी सावधानता बाळगाने हे सगळयात जास्त महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
00000

Friday, November 29, 2019


हिब्बट, माळाकोळी येथील
भूगर्भातील आवाजाच्या अनुषंगाने आवाहन
 नांदेड, दि. 29 :-  नांदेड जिल्‍हयात मुखेड तालुक्यात हिब्बट आणि लोहा तालुक्यात माळाकोळी येथील भूगर्भातील आवाज आणि भुकंपांच्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठातील भू भौतिकी विभागाचे वरीष्‍ठ अॅसोसिएट  प्रोफेसर  डॉ. टी. विजय कुमार यांच्‍यासोबत चर्चा केली.
चर्चेत डॉ. विजय कुमार यांनी पावसाचे अधिकतम प्रमाण असल्‍यास भूगर्भात जमा होणारे  पाणीसाठे आणि जमिनीतील फॉल्‍ट तथा प्‍लेटांचे घर्षण बेसॉल्‍ट खडक  तथा अंतर्गत खनिज यांच्‍याशी संयुग होऊन मुक्‍त होणाऱ्या वायुमुळे हे आवाज निर्माण होतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले. अशी परिस्थिती निर्माण झाल्‍यास न  घाबरता सावधगिरी बाळगण्‍याचे त्‍यांनी सांगितले. जमिनीतुन होणाऱ्या आवाजांची नोंद ही भूकंपमापक यंत्रावर होत नसुन भूकंपनाच्‍या तिव्रतेची नोंद होते, असे सांगितले.
हिब्‍बट आणि माळाकोळी याठिकाणी जमीनीतुन ध्‍वनिक उत्‍सर्जन आणि भूकंपाच्‍या हालचाली वारंवार अनुभविण्‍यात येत असल्‍याने जिल्‍हा प्रशासनाने वेळीच याची माहिती राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण मंत्रालय मुंबई,  भूकंप अन्‍वेषण केंद्र केंद्रीय पृथ्‍वी विज्ञान विभाग नवी दिल्‍ली आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपुर यांना वेळोवेळी निदर्शनास आणुन दिली असून यावर संशोधन सुरु आहे.
जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी 25 नोव्‍हेंबर 2019 रोजी स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठातील भूभौतिकी विभागाचे वरीष्‍ठ अॅसोसिएट प्रोफेसर डॉ. टि. विजय कुमार यांच्‍यासोबत एक तास चर्चा केली. नांदेड आणि सभोवतालचा प्रदेश हा सेस्मिक झोन- 2 या श्रेणीत येत असुन सोलापुर पासुन तेलंगाना राज्‍यातील बोधन पर्यंत संपुर्ण भूगर्भाची स्‍कॅनिंग होत असल्‍याची आणि ठिकठिकाणी याचे केंद्र उभारण्‍यात येत असल्‍याची  माहिती त्‍यांनी यावेळी दिली.
     ग्रामीण भागातील अनेक घर कच्‍चे आणि पत्र्यांचे असतात तसेच त्‍यावर मोठे लाकडाचे ओडके, खोड किंवा वजनदार दगड ठवलेले असतात ते अतिशय धोकादायक ठरतात. कारण भूकंपाच्‍या वेळी हे खाली पडुन मोठी जीवितहानी करतात. दोषपुर्ण बांधकाम हे भूकंपात फार जास्‍त धोकादायक ठरतात. भूकंपाच्‍या वेळी सावधानता बाळगाने हे सगळयात जास्‍त महत्‍वाचे असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
00000


जिल्हा परिषदेची गुरुवारी सर्वसाधारण सभा
नांदेड, दि. 29 :- नांदेड जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी 5 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 12.30 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.
00000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144
नांदेड, दि. 29 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 26 डिसेंबर 2019 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु: सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 डिसेंबर 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000


स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेसाठी
15 डिसेंबरला निवड चाचणी परीक्षा
नांदेड दि. 29 :-  सेतू समिती नांदेड संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत युपीएससी व एमपीएससी तयारी करण्यासाठी सेतू समिती संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत प्रवेश देण्यासाठी सन 2019-20 या वर्षातील निवड चाचणी परीक्षा 15 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 दुपारी 12 यावेळेत घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी 2 ते 9 डिसेंबर 2019 पर्यंत nanded.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहे. परीक्षा शुल्क दोनशे रुपये असून 2 ते 10 डिसेंबर 2019 या कालावधीत सकाळी 10 ते सायं 5 यावेळेत ग्रंथपाल स्पर्धा परीक्षा अभ्यासिका स्टेडीयम परिसर नांदेड यांच्याकडे भरणा करावी. परिक्षेचे स्थळ नांदेड जिल्ह्याच्या nanded.gov.in या संकेतस्थळावर वेगळ्याने प्रसिद्ध करुन प्रवेशपत्र ऑनलाईन काढण्याची सुविधा 12 ते 14 डिसेंबर 2019 या कालावधीत उपलब्ध राहील. परिक्षेचा निकाल 15 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वा. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव सेतू समिती नांदेड यांनी दिली आहे.  
000000


मयत आरोपी शेरुसिंघच्या
मृत्यूची दंडाधिकारी चौकशी  
नांदेड दि. 29 :- पोलीस स्टेशन अर्धापूर हद्दीत घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने गु.र.नं. 287 /2019 क. भा.द.वि. सह कलम 3/25, 26 (2) भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्ह्यातील मयत आरोपी शेरुसिंघ ऊर्फ शेरा पि. दलबिरसिंघ खैरा रा. माळटेकडी  यांच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहे.   
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी पोलीस स्टेशन अर्धापूर यांच्या हद्दीत गुरुवार 21 नोव्हेंबर 2019 रोजी शेरसिंघ ऊर्फ शेरा पि. दलबिरसिंघ खैरा रा. माळटेकडी नांदेड यांच्या समवेत घडलेल्या पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याने या मृत्युचे कारण निश्चितीसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 प्रमाणे नांदेड उपविभागीय दंडाधिकारी यांना दंडाधिकारी चौकशी अधिकारी म्हणून दंडाधिकारी चौकशी 15 दिवसाचे आत करुन अहवाल सादर करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
0000


पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने  
सवलती लागू करण्याचा आदेश निर्गमीत
नांदेड दि. 29 :- ऑक्‍टोबर, नोव्‍हेंबर 2019 मध्‍ये झालेल्‍या “क्‍यार “ व “महा“ चक्रिवादळामुळे झालेल्‍या अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्‍यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 562 गावांमध्ये विविध सवलती लागू करण्‍याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केला आहे.
             आदेशात म्हटले आहे की, ऑक्‍टोबर – नोव्‍हेंबर 2019 मध्‍ये झालेल्‍या “क्‍यार “ व  “महा “ चक्रि वादळाने झालेल्‍या अवेळी पावसामुळे विविध सवलती लागू करण्‍यास शासनाने मान्‍यता दिली आहे. त्यानुसार जिल्‍हयातील 16 तालुक्‍यात एकूण 1 हजार 562 गावामध्‍ये  अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्‍याने जमीन महसूलात सूट. शेतीपिकांच्‍या नुकसान झालेल्‍या शेतक-यांच्‍या पाल्‍यांना शाळा व महाविद्यालयीन परिक्षा शुल्‍कात माफी देण्याची सवलत लागू राहील.  शासनाच्‍या अनुज्ञेय या सवलती देण्‍याची व्‍यवस्‍था संबंधीत विभाग प्रमुखांनी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000

वृत्त क्रमांक नांदेडमध्ये १४ वर्षीय प्रणव मेंडके बेपत्ता ; शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन नांदेड, दि. २८ ऑक्टोबर : नांदेड शहरातील भाग्यनगर प...