Friday, February 2, 2018

महिला उद्योजकांना पुरस्कारासाठी   
अर्ज करण्यास 5 फेब्रुवारीची मुदत   
नांदेड दि. 2 :-  महिला उद्योजकांसाठी राज्याचे विशेष धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणानुसार सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला उद्योजकांना प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक महिला उद्योजकांनी सोमवार 5 फेब्रुवारी 2018 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज, कागदपत्रासह महाव्यवस्थापक  जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन नांदेड येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील पात्रता व निकष पुर्ण करणाऱ्या महिला उद्योजक अर्ज करण्यास पात्र राहतील. शासन निर्णय 14 डिसेंबर 2017 मध्ये विहित करण्यात आलेली महिला उद्योजकांची व्याख्या लागू राहील. एकल मालकी घटक - महिला उद्योजकांचे 100 टक्के भाग भांडवल. भागीदारी घटक - भागीदारी घटक ज्यामध्ये  100 टक्के भाग भांडवल. सहकारी क्षेत्र- सहकारी कायद्यांतर्गत ज्या सहकारी संस्थेमध्ये 100 टक्के महिला उद्योजकांचा समावेश असलेली संस्था. खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादित घटक- ज्या घटकामध्ये महिला उद्योजकांचे किमान 100 टक्के भाग भांडवल असेल अशी कंपनी. स्वयं सहाय्यता बचत गट - जो बचत गट नोंदणीकृत असून, सदर व्याख्येतील क्रमांक 3 आणि 4 नुसार स्थापित झालेले आहे. उद्योगांच्या या नमुद केलेल्या घटकांमध्ये किमान 50 टक्के महिला कामगार असलेल्या उपक्रमांना योजनेंतर्गत प्रोत्साहनासाठी पात्र समजण्यात येईल. उद्योग घटक गेल्या 3 वर्षात सतत उत्पादनात असावा. महिला उद्योग घटकास राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत यापूर्वी कुठलाही पुरस्कार मिळालेला नसावा. उद्योग घटकाची निवड करताना विविध मुद्यांचा समावेश करण्यात येईल. जसे गेल्या 3 वर्षात घटकाचे उत्पादन, रोजगार निर्मिती, गुंतवणुक व नफा याद्वारे दिलेल्या वाढीचा दर, तंत्रज्ञानाची निवड व वापर ( स्वत: विकसीत केलेले, स्वदेशी, परदेशी ), उद्योजकेची पार्श्वभुमी, प्रथम पिढीची उद्योजिका आहे किंवा कसे ? उद्योग उभारणीत स्वावलंबित्व उद्योगाच्या स्थानाची निवड, उत्पादनाचा विकास (संशोधन व विकासासाठीचे प्रयत्न, गुणवत्ता नियंत्रणासाठीची उपाय आदी), आयात  पर्यायी उत्पादन व निर्यात, डायर्व्हसिफीकेशन व बाजारपेठेत नव्या उत्पादनाचा यशस्वीपणे समावेश, उद्योगाचे व्यवस्थापन यामध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल, लेखे, मार्केटिंगबाबत, कामगार कल्याण, उद्योजिका अनु.जाती, अनु.जमातीची असल्यास अधिकचे गुण आदी निकषांचा विचार करुन पुरस्कार देण्यात येतील. फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबई येथे आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स- 2018 समारंभात पुरस्कार स्वरुपात सन्मानपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ( दुरध्वनी नंबर 02462 250056 E-mail- didic.nanded@maharashtra.gov.in) येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000
उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री
डॉ. महेन्द्र सिंह यांचा दौरा
नांदेड दि. 2 :- उत्तर प्रदेश राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय आणि आरोग्य विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा राष्ट्रीय मंत्री भाजपा डॉ. महेंद्र सिंह हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 3 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. आगमन व 8.50 वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.10 शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 10 वा. राज्यातील ग्रामविकास विभागाकडून केल्या गेलेल्या कामांची पाहणी व विभागीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. लोकसभा क्षेत्र नांदेड येथील कार्यकर्ते व भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वा. वाहनाने परभणीकडे प्रयाण करतील.

000000

Thursday, February 1, 2018

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा 
नांदेड दि. 1 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी पुणे येथुन शासकीय वाहनाने सोलापूर-औसा-लातूर मार्गे दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह मुखेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार 3 फेब्रवारी रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह मुखेड येथून सिद्धाश्रम तपोवन हनुमानगड  तेलूर ता. कंधारकडे प्रयाण. सकाळी 11 वा. सिद्धाश्रम तपोवन हनुमानगड तेलूर येथे आगमन व श्री स्वामी प्रणवानंदजी सरस्वती महाराज (वृंदावन) आयोजित आशिर्वचन व महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वा. सिद्धाश्रम तपोवन हनुमानगड तेलूर येथून उजनी जि. सोलापूरकडे प्रयाण करतील.

0000000
समाजमाध्यमांच्या विधायक उपयोगाचा उपक्रम
‘सोशल मीडिया महामित्र’
सहभागी होण्याचे आवाहन
नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड दि. 1 : आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
देशातील बहुतांश तरुण फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत असतात. ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ही बाब समोर ठेऊन सोशल मीडियाचा सदुपयोग समाजात अधिक विवेकवादी आणि सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा म्हणून करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘सोशल मीडिया महामित्र’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात ‘सोशल मीडिया महामित्र’ पुरस्कारप्राप्त व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद  साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील  मिळणार आहे.
या उप्रकमासाठी आज 1 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु झाली असून ती 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’ अथवा ॲपलच्या ‘’ॲप स्टोअर वरुन महामित्र (Maha Mitra) हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) प्रत्येकी 10 ‘सोशल मिडिया महामित्र’ निवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी 1 महामित्राची राज्यस्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात निवडलेल्यांना ‘सोशल मिडिया महामित्र’ पुरस्कार देण्यात येईल तसेच त्यांना मान्यवरांशी संवाददेखील साधता येणार आहे.
विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप पाच ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्या, फोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्या, किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म/मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेत, सहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मते, सोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेत, आलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. या आधारे महामित्र निवडण्यात येतील. या निकषांना मिळणाऱ्या गुणांकन आधारे आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल.  निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी  निवड करण्यात येईल. गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
सकारात्मक व सौहार्दपूर्ण महाराष्ट्र बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी ‘सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम
नांदेड दि. 1 :- राज्‍य निवडणूक आयोगाने  मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्‍याने स्‍थापीत ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंच पदासह सर्व सदस्‍य पदांसाठी तसेच रिक्‍त पदांच्या पोट निवडणूकासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार नांदेड जिल्‍हयातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्‍या ग्रामपंचायतीचा तपशील पुढील प्रमाणे आहे, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने देण्यात आली आहे.
तालुका
ग्रामपंचायतीचे नाव
देगलूर
गोगला गोविंद तांडा
धर्माबाद
हसनाळी
माहुर
चोरड (जुनापाणी)
            तर रिक्‍त पदांचा पोट निवडणूक असलेल्‍या ग्रामपंचायतीचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
तालुका 
पोट निवडणूक असलेल्‍या गा.पं. संख्‍या
रिक्‍त पदांची संख्‍या
शेरा
माहूर
19
40
हिंगणी थेट सरपंच  निवड
किनवट
50
83
मलकजाम व मारेगाव वरचे ग्रा.पं. थेट सरपंच निवड
हिमायतनगर
1
2

हदगाव
10
21

अर्धापूर
5
8

नांदेड
11
15

मुदखेड
3
3

भोकर
4
5

उमरी
8
14

धर्माबाद
15
22

बिलोली
8
13

नायगाव खै.
2
2

लोहा
15
24
खरबी  थेट सरपंच निवड
कंधार
6
6

मुखेड
9
17

देगलूर
20
23

एकुण
186
298
4

  सार्वत्रिक व पोटनिवडणूका असलेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये आचारसंहिता 22 जानेवारी 2018 रोजी रात्री 12 वाजल्‍यापासुन लागू झालेली असुन निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा आचारसंहिता कालावधीत कुणालाही  करता येणार नाही.
   आरक्षीत जागावर निवडणूक लढविणा-या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्राऐवजी  हमीपत्र घेण्‍याच्‍या सवलतीस ग्रामविकास विभागाकडून दि. 31 डिसेंबर 2017 नंतर मुदतवाढ न देण्‍यात आल्‍याने या निवडणुकासाठी आरक्षीत पदावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 -1 अ नुसार अनिवार्य आहे. याची सर्व इच्‍छुक उमेदवारांनी नोंद घ्‍यावी.
सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्रे संगणकीकृत पध्‍दतीने (ऑनलाईन) तर पोट निवडणूकासाठी नामनिर्देशनपत्रे पारंपारीक पध्‍दतीने (Manually)  स्‍वीकारण्‍यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील
निवडणूकीचे टप्‍पे
दिनांक
तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक
दि. 25/1/2018 (गुरुवार)
नामनिर्देशनपत्रे मागविण्‍याचा व सादर करण्‍याचा दिनांक व वेळ
दि. 5/2/2018 (सोमवार) ते दि. 10/2/2018 (शनिवार) वेळ स. 11.00 ते दु. 4.30
नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचा दिनांक व वेळ
दि. 12/2/2018 (सोमवार) वेळ स. 11.00 वाजल्‍यापासुन छाननी संपेपर्यंत
नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक व वेळ
दि. 15/2/2018 दु. 3.00 वाजेपर्यंत
निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरित्‍या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्‍याचा दिनांक व वेळ
दि. 15/2/2018 (गुरुवार) दु. 3.00 वा. नंतर
आवश्‍यक असल्‍यास मतदानाचा दिनांक
दि. 25/2/2018 (रविवार) स. 7.30 वा. पासुन ते सायं. 5.30 वा. पर्यंत)
मतमोजणीचा दिनांक
दि. 26/2/2018 (सोमवार)
निवडणूकांचा निकाल प्रसिध्‍द करण्‍याचा अंतिम दिनांक
दि. 27/2/2018 (मंगळवार) पर्यंत

या निवडणूकीमध्‍ये माहे सप्‍टेंबर व ऑक्‍टोबर 2017 मध्‍ये पार पडलेल्‍या  सार्वत्रिक निवडणूकीच्‍यावेळी रिक्‍त असलेल्‍या सरपंच पदाची पोट निवडणूक घेण्‍यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणूका असलेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या बाबतीत सरपंच थेट पध्‍दतीने निवडून द्यावयाचे असल्‍याने निवडणूक आचारसंहितेच्‍या अंमलबजावणीबाबत विशेष उपाययोजना करण्‍यात येणार  आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

000000

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...