Wednesday, February 16, 2022

 लोकसेवा आयोगाच्या सन 2022 च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी खालील प्रमाणे अंदाजित वेळापत्रक आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी दिली आहे.  

लोकसेवा आयोगाच्या सन 2022 च्या परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील. 

राज्य सेवा परीक्षा-2021 साठी जाहिरात ऑक्टोबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी घेण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल मार्च 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 7, 8 व 9 मे 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होणार आहे. 

दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मे 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होईल. 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी जाहिरात ऑक्टोबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली आहे. या पदासाठी पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल एप्रिल 2022 मध्ये जाहीर होईल.   

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-1 या पदासाठी मुख्य परीक्षा 9 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल. 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 17 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.   

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, राज्य कर निरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 24 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.   

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी मुख्य परीक्षा 31 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.   

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 3 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मे 2022 मध्ये लागेल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्र.1 या पदासाठी मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्र.2 लिपिक-टंकलेखक या पदासाठी मुख्य परीक्षा 13 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी मुख्य परीक्षा 20 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 कर सहाय्यक या पदासाठी मुख्य परीक्षा 27 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 तांत्रिक सहाय्यक या पदासाठी मुख्य परीक्षा 10 सप्टेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 उद्योग निरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 17 सप्टेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल जुन 2022 मध्ये लागेल.  

 

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 29 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021  या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 16 एप्रिल 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल मे 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 3 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 6 मार्च 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल एप्रिल 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

राज्यसेवा परीक्षा-2022 या पदासाठी जाहिरात एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 19 जून 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 15, 16 व 17 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल जानेवारी 2023 मध्ये जाहीर होईल.

  

दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2022 या पदासाठी जाहिरात मार्च 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 7 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 20 नोव्हेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल जानेवारी 2023 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपित्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 या पदासाठी जाहिरात जून 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 8 ऑक्टोंबर 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये लागेल.  

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 संयुक्त पेपर क्रमांक-1 या पदासाठी मुख्य परीक्षा 24 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल.  

 


महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022
 संयुक्त पेपर क्रमांक-2, पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 31 डिसेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल.

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 पेपर क्रमांक-2, राज्य कर निरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 7 जानेवारी 2023 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 पेपर क्रमांक-2, सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी मुख्य परीक्षा 14 जानेवारी 2023 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2022  या पदासाठी जाहिरात 2 जून 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 5 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.

000000

Tuesday, February 15, 2022

 नांदेड जिल्ह्यात 22 व्यक्ती कोरोना बाधित

तर 28 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 882 अहवालापैकी 22 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर अँटिजेन तपासणीद्वारे 6 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 581 एवढी झाली असून यातील 99 हजार 752 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 141 रुग्ण उपचार घेत असून यात 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 688 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, पुसद 1, परभणी 2, हदगाव 1, औरंगाबाद 1, तेलंगणा 1, किनवट 3, हिंगोली 1, मुखेड 1, यवतमाळ 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, माहूर 1, नायगाव 2, हिंगोली 1 असे एकुण 22 कोरोना बाधित आढळले आहे.  

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 11,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16 असे एकुण 28 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.  

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 14, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 55, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 62, खाजगी रुग्णालय 10 असे एकुण 141 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 64 हजार 425

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 45 हजार 65

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 581

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 752

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 688

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-141

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2021 साठी

प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ

 

· प्रवेशिका 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि.15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

00000

 कंत्राटी पदांसाठी माजी सैनिकांची निवड चाचणी 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-औरंगाबाद स्मार्ट सिटी बस जड वाहन वाहतूक परवानाधारक अनुभवी 100 माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर-कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड प्रक्रिया 15 ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नंदनवन कॉलनी औरंगाबाद येथे राबवली जाणार आहे. यासाठी पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह (डिस्चार्ज बुकची प्रत, आर्मी व सिव्हिल हेव्ही वेहिकल ड्रायव्हिंग लायसन्स आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इत्यादी) आपली नाव नोंदणी  करुन घ्यावी. नांदेड, हिंगोली, जालना, बीड, बुलढाणा, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील इच्छूक माजी सैनिकांनाही प्रावधान देण्यात येणार आहे.

 

निवड चाचणीसाठी पात्रता :- सैन्य दलातील ट्रेड DSV (Spl Veh)/ AM-50/ Dvr/ Dvr (MT)/ DMT/ Dvr GNR/ Dvr (AFT) यापैकी असावा. दहावी / बारावी उत्तीर्ण आणि आर्मी ग्रॅजुएट शैक्षणिक आर्हता आवश्यक आहे. वैध प्रवासी बस वाहतूक परवाना (PSVBUS (TRV-PSV-Bus) धारकास प्राधान्य. निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडीच्या/ नियुक्तिच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तयार करावा. सैन्यदलात हेव्ही वेहिकल ड्रायव्हिंगचा किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मेडिकल कॅटेगरी SHAPE-I. वयोमर्यादा 48 वर्षे आहे. माजी सैनिकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद दुरध्वनी 0240-2370313 या पत्यावर / दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. निवड प्रक्रियेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा प्रत्यक्ष सहभागी नाही, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मार्गदर्शक सूचना  

नांदेड (जिमाका) दि. 15 :- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवार 19 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात  साजरी करण्यात येते.  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा उत्सव साजरा करताना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने  मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे. यावर्षी 19 फेबुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत असतांना शिवज्योत वाहण्याकरीता 200 भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरीता 500 भाविकांना परवानगी देण्यात आली  आहे.

अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी अथवा इतर गड किल्यांवर जाऊन तारखेनुसार दिनांक 18 फेबुवारी रोजीच्या मध्यरात्री  12 वाजता एकत्र  येतात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करतात. यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठया प्रमाणात  एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती  साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुक काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्याठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.

छत्रपती शिवाजी महाराज  जयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे, रक्तदान, आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनिटायझर इक्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

कोविड-19 च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनवर्सन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय, शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस, प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्धी झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, अशा सूचना शासनाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे निर्गमित केल्या आहेत.

000000

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...