Saturday, January 16, 2021

 

नांदेड जिल्ह्यातील 262 आरोग्य रक्षकांना कोरोनाची लस

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यातील लसीकरणाला आरोग्य रक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने लसीकरण करुन घेतले. मुदखेड तालुक्यातील मुगट येथे आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी रांगा लावून लसीकरण करुन घेतल्यामुळे पहिल्याच फेरीत संपूर्ण ग्रामीण भागात सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे. आज दिवसअखेरपर्यंत नांदेड जिल्ह्यात 262 आरोग्य रक्षकांनी कोरोनाची लस घेतली.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त  कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; ...