Friday, September 11, 2026

वृत्त क्रमांक

लोहा तालुक्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरे

नांदेड (जिमाका), दि. ११ : कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदी व पुरावे सादर करता यावेत, तसेच प्रमाणपत्र वितरणाची कार्यवाही सुलभ व्हावी, यासाठी लोहा तालुक्यात दि. १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार आयोजित या शिबिरांमध्ये मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे कुणबी नोंदी शोधणे, पुराव्यांची पडताळणी करणे, अर्ज स्वीकारणे तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

लोहा तालुक्यातील कापशी बु. येथे १५ सप्टेंबर, शेवडी बा. येथे १५ सप्टेंबर आणि सावरगाव न. येथे १६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुक्यातील नागरिकांनी आपल्या गावाशी संबंधित महसूल मंडळाच्या ठिकाणी आयोजित विशेष शिबिरास आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार, लोहा यांनी केले आहे.

***

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक खरीप पणन हंगाम 2026-27 : शासकीय धान्य खरेदीसाठी एकसमान गुणवत्ता निकष लागू नांदेड (जिमाका), दि. 11 : केंद्र शासनाच्या अन्न व सा...