Monday, April 27, 2020

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 15 संशयितांची झाली नोंद
घेण्यात आलेले 737 नमुन्यांपैकी 677 जण निगेटिव्ह ;
53 जणांचा अहवाल प्रलंबित तर दोन कोरोना रुग्ण पॉझीटिव्ह   
नांदेड, दि. 27 (जिमाका) :- कोरोना विषाणु संदर्भात आज सोमवार 27 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकुण 1 हजार 15 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी घेण्यात आलेले स्वॅब एकुण 737 आहेत, त्यापैकी 677 निगेटिव्ह असून 53 स्वँब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5  स्वँब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे.
आतापर्यंत एकूण घेण्यात आलेले स्वँब 737 असून त्यापैकी 2 रुग्णांचा स्वँब पॉझीटिव्ह आढळला आहे. हे रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल आहेत.
नांदेड शहरातील पिरबुऱ्हाणनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल बुधवार 22 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला आहे.  या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले, या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  
नांदेड शहरातील अबचलनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल रविवार 26 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला असून या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे. तसेच त्याचा निकटवर्तीय संपर्कातील 16 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही अफवावर विश्वासु ठेवु नका, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
000000
अबचलनगर, परिसर क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित
येथील नागरिकांच्या हालचालीवर बंधने ;
आवश्यक सेवा महानगरपालिकेतर्फे घरपोच मिळणार ;
संपर्कासाठी नियंत्रण अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
नांदेड, दि. 27 (जिमाका):- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत अबचलनगर या क्षेत्रात कोव्हीड-19 चा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नियमानुसार अबचलनगर व परिसर या क्षेत्रामध्ये रोगाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून हे क्षेत्र  कंटेनमेंट झोन (अटकाव) Containment Zone म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच तेथील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार अनुज्ञेय असलेल्या सर्व आवश्यक त्या सेवा या भागात बंद करण्यात येत आहेत. या सेवा महानगरपालिकेकडून घरपोच देण्यात येतील. त्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहाय्यक अधिकारी म्हणून प्रकाश गच्चे, सुपरवायझर आणि त्यांच्या अधिनस्त वसुली लिपिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल. तक्रार असल्यास नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद बदीयोद्दीन 9823012456, बळीराम भुरके मो. 9881120873, सुग्रीव अंधारे मो. 9011000941, प्रकाश गच्चे मो. 8888801960 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे.
00000

Sunday, April 26, 2020


अबचलनगर भागात कोरोनाचा एक रुग्ण ;
हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून सील केला ;
जनतेने घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  
नांदेड, दि. 27 (जिमाका):-  कोव्हीड-19 च्या अनुषंगाने  नांदेड शहरात अबचलनगर भागातील 44 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल काल (26 एप्रिल रोजी) पॉझिटिव्ह आला आहे. त्या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथे उपचार सुरु आहेत. नांदेड शहरातील अबचलनगर हा भाग कंटेनमेंट झोन (अटकाव) म्‍हणून सील करण्यात आला आहे.  या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच रहावे. या भागात रुग्णाच्या  संपर्कात आलेल्या संभावित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली आहेत. 
जनतेने घाबरुन न जाता, प्रशासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करावे आणि अत्‍यंत आवश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडु नये, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
00000


Saturday, April 25, 2020


नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये       
कोरोना : 605 जणांचा निगेटिव्ह अहवाल
नांदेड, दि. 25 (जिमाका):- कोरोना विषाणु संदर्भात आज शनिवार 25 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकुण 962 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी घेण्यात आलेले स्वँब एकुण 649 आहेत, त्यापैकी 605 निगेटिव्ह असून 38 स्वँब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5  स्वँब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे.
आतापर्यंत एकूण घेण्यात आलेले स्वँब 649 असून त्यापैकी 1 रुग्णाचा स्वँब पॉझीटिव्ह आढळला आहे. हा रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल आहे. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले, या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही अफवावर विश्वासु ठेवु नका, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
000000

Friday, April 24, 2020

ग्रामीण पाणी पुरवठा पाणीटंचाईचा आढावा 
टंचाईची कामे वेळेत पूर्ण करा
                       --- पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 24:- जिल्ह्यातील टंचाईची कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेचे जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या तक्रारीची नोंद घेण्यात यावी असे, निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निजी कक्षात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत त्यांनी दिले.  
या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, माजी राज्यमंत्री डी पी सावंत, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष वाहने, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती सुशिलाताई बेटमोगरेकर यांच्यासह विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, पाणीपुरवठा योजनांचे कामे कंत्राटदारांनी अर्धवट सोडलेले कामे पूर्ण करुन घेण्यात यावीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी सदरचा प्रश्न मार्गी लावावा. भुजल सर्वेक्षणाचे काम बारा दिवसात भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तात्काळ करावे. देगलूर, मुखेड येथे पाणीटंचाई गावामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होत असेल, तर त्यावर उपाययोजना तात्काळ करण्यात यावीत.
पाणी टंचाई 2019-2020 निवारण कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या उपाययोजनांचा व खर्चाचा आढावा घेतला. तसेच नांदेड जिल्हा ग्रामीण पाणी टंचाई कार्यक्रम 2019, विहीर अधिग्रहण टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे,नळ योजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, सार्वजनिक विहीर खोल करणे, गाळ काढणे उन्हाळ्यात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मौलिक सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.
पाणी, कर्जाबाबतचे ग्रामपंचायतींचे जलसंधारणाचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठविण्यात यावा. ग्रामपंचायतीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स रूम तयार करण्यात यावीत. जिल्ह्यातील नगरपालिकेला आवश्यक आसलेल्या निधी माहिती घेवून मागणी करण्याबाबतही सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
मनरेगाची कामे सोशल डिस्टन्स ठेवून करण्यात यावी. तसेच मनरेगाची कामे अधिकाधिक वाढवण्याबाबतही सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पाणी टंचाईबाबतचा आढावा घेतला.
0000 


रास्तभाव दुकानदारांविरुद्ध
प्राप्त तक्रारी निकाली काढण्यासाठी
तालुकानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
नांदेड, दि. 24 (जिमाका) :- जिल्‍हयात सर्वत्र अन्‍न धान्‍य वितरण करण्‍यात येत असून विविध योजनांचे निकष, अन्‍नधान्‍य परिमाण, दर यामध्‍ये शिधापत्रिकाधारक यांचा संभ्रम झाल्‍याने रास्‍त भाव दुकानदारांविरूध्‍द मोठ्या प्रमाणात तक्रारी व्‍हॉटसअप, ई-मेल, दुरध्‍वनी व लेखी स्‍वरूपात जिल्‍हा प्रशासनाकडे प्राप्‍त होत आहेत. या तक्रारी निकाली काढण्‍याच्‍यादृष्‍टीने तालुकानिहाय नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी यांची नियुक्‍ती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे.  
राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार दिनांक 14 मार्च 2020 अधिसुचना निर्गमित झाल्यानंतर राज्‍यात लॉकडाऊन जाहीर केले आहे.
सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेंतर्गत पात्र लाभार्थ्‍यांना विविध योजनेमार्फत अन्‍नधान्‍य पुरविण्‍याचे जाहीर केले आहे. त्‍यामध्ये एप्रिल ते जून 2020 यामध्‍ये अंत्‍योदय, प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्‍यांना त्‍यांचे नियमीतचे धान्‍य वाटप झाल्‍यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेंतर्गत याच लाभार्थ्‍यांना प्रति व्‍यक्‍ती 5 किलो तांदुळ मोफत देण्‍यात येत आहे. तसेच नियमीत एपीएल शेतकरी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी यांना प्रती व्‍यक्‍ती 2 किलो तांदुळ दर 3 रुपये प्रति किलो व 3 किलो गहू दर 2 रुपये प्रति किलो प्रमाणे वितरीत करण्‍यात येत आहे.  तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारक राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्‍या, शेतकरी योजनेंतर्गत सवलतीच्‍या दराने लाभ मिळत नसलेल्‍या तसेच ज्‍यांचे वार्षिक कौटुंबीक उत्पन्‍न 1 लाखाच्‍या आत आहे, ज्‍यांची संगणकीय प्रणालीमध्‍ये नोंद झाली नाही अशा पात्र लाभार्थ्‍यांना मे व जुन 2020 या कालावधीत गहू 8 रुपये प्रति किलो व तांदुळे 12 रुपये प्रति किलो प्रतिमहा प्रति व्‍यक्‍ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ या प्रमाणे वितरीत करण्‍यात येणार आहे.
जिल्‍हयात रास्‍तभाव दुकानदारांविरूध्‍द प्राप्त होणाऱ्या तक्रारी निकाली काढण्‍यासाठी पुढीलप्रमाणे तालुकानिहाय नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. यामध्ये तालुका नोडल अधिकारी, सहा.नोडल अधिकारी यांचे नाव व मोबाईल क्रमांक कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.
नांदेड तालुका- तहसिलदार अरून जऱ्हाड 9511774349, सारंग चव्हाण ना.त.पुरवठा 9822232545, 02462-236769. अर्धापूर-तहसिलदार सुजीत नरहरे 8275273829, जाधव ना.त. पुरवठा 9823271459 02462-272167. कंधार-तहसिलदार सखाराम मांडवगडे 9011925584, ताडेवार ना. त. पुरवठा 9822638671, 02466-223424. लोहा- तहसिलदार व्ही. एम. परळीकर 9049286856, राम बोरगावकर ना.त.पुरवठा 9404465313, 02466-242460. भोकर- तहसिलदार भरत सुर्यवंशी 9623398559, के. व्हि. मस्के ना.त.पुरवठा 8390247049, 02467-222622. मुदखेड-तहसिलदार दिनेश झांपले 9422965456, एस. जी. जोगदंड ना.त.पुरवठा 8669064978, 02462-275551. धर्माबाद-तहसिलदार शिंदे डी. एन. 9422611487, एस. एन. हांदेश्वादर ना. त. पुरवठा 9423439557, 02465-245200. उमरी- तहसिलदार एम. एन. बोथीकर 9921844511, राजेश लांडगे ना.तह. 9049945378, 02467-244202. देगलूर- तहसिलदार अरविंद बोळंगे 7776889999, वसंत नरवाडे ना.त.पुरवठा 9421913691, 02463-255033. मुखेड- तहसिलदार काशिनाथ पाटील 9422911933, आर. आर. पदमवार नरवाडे ना.त.पुरवठा 8805889485, 02461-222522. बिलोली- तहसिलदार राजपुत विक्रम महाजन 9922317071, उत्तम निलावार ना.त.पुरवठा 8208290063, 02465-223322. नायगाव- तहसिलदार श्रीमती सुरेखा नांदे 7775034666, एन. एस. भोसीकर ना.त.पुरवठा 9545929394, 02465-203592. किनवट- तहसिलदार नरेंद्र तबाजी देशमुख 7588560342, श्री. लोखंडे ना.त.पुरवठा 9421759608, 02469-222008. माहूर- तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर 9421490400, 8668676787, गोविंदवार ना.त.पुरवठा 9423352436 02460-268521, हदगाव- तहसिलदार जीवराज डापकर 7350531111, विजय येरावाड ना.त.पुरवठा 9545009009, 02468-222328. हिमायतनगर- तहसिलदार जाधव एन. बी. 9552972949, अनिल तामसकर ना.त.पुरवठा 9403460422, 02468-244428 याप्रमाणे आहेत. 
नोडल अधिकाऱ्यांनी कार्यालयाकडून ई-मेल, दुरध्‍वनी, व्‍हॉटसअप व पत्राद्वारे तसेच नागरिकांकडून प्राप्‍त झालेल्‍या तक्रारीबाबत स्‍वत: किंवा आपले यंत्रेणेमार्फत 24 तासाच्या आत वस्‍तुस्थितीदर्शक चौकशी करावी. त्यानंतर केलेल्‍या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. ज्‍या तक्रारीमध्‍ये तथ्‍य दिसुन येत नाही, त्‍या तक्रारी त्‍वरीत निकाली काढून जिल्हाधिकारी कार्यालयास तसे अवगत करावे. तक्रारदारांने चुकीची तक्रार केल्‍याचे चौकशीअंती निदर्शनास आल्‍यास तक्रारदाराविरूध्‍द नियमानुसार फौजदारी स्‍वरुपाची व योग्‍य ती कार्यवाही करावी. या परिपत्रकात दिलेल्‍या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे. यात हलगर्जीपणा, टाळाटाळ केल्‍याचे निर्दशनास आल्‍यास संबंधितांविरुध्‍द नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असे परित्रकात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.  
000000


अन्न-आस्थापना दुकानांच्या केल्या 298 तपासण्या
सुचनांचे पालन करण्याचे अन्न औषध प्रशासनचे आवाहन   
नांदेड, दि. 24 (जिमाका) :- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्न आस्थापना दुकानांच्या तपासण्या करण्यात येत असून अन्न व औषध प्रशासन नांदेड कार्यालयाच्या अखत्यारीतील नांदेड शहर, अर्धापुर व मुदखेड येथील किराणा, प्रोविजन स्टोअर्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, ऑईल शोरुम व जीवनावश्यक वस्तू उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्री दुकाने यांच्या 298 तपासण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी पेढीतील कामगारांना, पेढीमालकांना मास्क व सॅनिटायझर्सचा वापर करण्याबाबत सुचित करण्यात आले.
शासनस्तरावर विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. अन्न व औषध प्रशासन नांदेड या कार्यालयाच्यावतीने सुध्दा विविध उपाय योजना राबविल्या जात असून त्याचाच भाग म्हणुन
किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक पुरवठा ग्राहकांना व्हावा याबाबत देखील प्रशासनाकडून सर्व पेढीधारकांना यथायोग्य सुचना देण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणी अन्न आस्थापनाधारक यांच्या बैठका घेऊन जीवनावश्यक वस्तुंचा काळा बाजार, साठेबाजी, प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करू नये, सामाजीक अंतर राखणे आणि जमावबंदी कलम 144 चे काटेकोर पालन करावे अन्यथा कठोर कार्यवाहीस सामोर जावे लागेल याबाबत निदर्शीत करण्यात आले आहे. सर्व अन्न आस्थापनाधारकांना देण्यात आलेल्या सुचनांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...