Sunday, April 26, 2020


अबचलनगर भागात कोरोनाचा एक रुग्ण ;
हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून सील केला ;
जनतेने घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  
नांदेड, दि. 27 (जिमाका):-  कोव्हीड-19 च्या अनुषंगाने  नांदेड शहरात अबचलनगर भागातील 44 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल काल (26 एप्रिल रोजी) पॉझिटिव्ह आला आहे. त्या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथे उपचार सुरु आहेत. नांदेड शहरातील अबचलनगर हा भाग कंटेनमेंट झोन (अटकाव) म्‍हणून सील करण्यात आला आहे.  या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच रहावे. या भागात रुग्णाच्या  संपर्कात आलेल्या संभावित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली आहेत. 
जनतेने घाबरुन न जाता, प्रशासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करावे आणि अत्‍यंत आवश्‍यक कारणशिवाय घराबाहेर पडु नये, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...