Monday, April 27, 2020

अबचलनगर, परिसर क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित
येथील नागरिकांच्या हालचालीवर बंधने ;
आवश्यक सेवा महानगरपालिकेतर्फे घरपोच मिळणार ;
संपर्कासाठी नियंत्रण अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
नांदेडदि. 27 (जिमाका):- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत अबचलनगर या क्षेत्रात कोव्हीड-19 चा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नियमानुसार अबचलनगर व परिसर या क्षेत्रामध्ये रोगाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून हे क्षेत्र  कंटेनमेंट झोन (अटकाव) Containment Zone म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच तेथील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार अनुज्ञेय असलेल्या सर्व आवश्यक त्या सेवा या भागात बंद करण्यात येत आहेत. या सेवा महानगरपालिकेकडून घरपोच देण्यात येतील. त्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहाय्यक अधिकारी म्हणून प्रकाश गच्चे, सुपरवायझर आणि त्यांच्या अधिनस्त वसुली लिपिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल. तक्रार असल्यास नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद बदीयोद्दीन 9823012456, बळीराम भुरके मो. 9881120873, सुग्रीव अंधारे मो. 9011000941, प्रकाश गच्चे मो. 8888801960 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...