रास्तभाव दुकानदारांविरुद्ध
प्राप्त तक्रारी निकाली काढण्यासाठी
तालुकानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
नांदेड, दि. 24 (जिमाका) :- जिल्हयात सर्वत्र अन्न धान्य वितरण करण्यात
येत असून विविध योजनांचे निकष, अन्नधान्य परिमाण, दर यामध्ये शिधापत्रिकाधारक
यांचा संभ्रम झाल्याने रास्त भाव दुकानदारांविरूध्द मोठ्या प्रमाणात तक्रारी व्हॉटसअप, ई-मेल, दुरध्वनी व लेखी स्वरूपात
जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. या तक्रारी निकाली काढण्याच्यादृष्टीने
तालुकानिहाय नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव
रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,
3 व 4 मधील तरतुदीनुसार दिनांक 14 मार्च 2020 अधिसुचना निर्गमित झाल्यानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध योजनेमार्फत अन्नधान्य
पुरविण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये एप्रिल ते जून 2020 यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांचे नियमीतचे धान्य
वाटप झाल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत याच लाभार्थ्यांना
प्रति व्यक्ती 5 किलो तांदुळ मोफत देण्यात येत आहे. तसेच
नियमीत एपीएल शेतकरी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी यांना प्रती
व्यक्ती 2 किलो तांदुळ दर 3 रुपये प्रति किलो व 3 किलो गहू दर 2 रुपये प्रति किलो प्रमाणे वितरीत
करण्यात येत आहे. तसेच ज्या शिधापत्रिकाधारक
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या, शेतकरी योजनेंतर्गत सवलतीच्या
दराने लाभ मिळत नसलेल्या तसेच ज्यांचे वार्षिक कौटुंबीक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे, ज्यांची संगणकीय प्रणालीमध्ये नोंद झाली नाही
अशा पात्र लाभार्थ्यांना मे व जुन 2020 या कालावधीत गहू 8 रुपये प्रति किलो व तांदुळे 12 रुपये प्रति किलो प्रतिमहा प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ या प्रमाणे
वितरीत करण्यात येणार आहे.
जिल्हयात रास्तभाव दुकानदारांविरूध्द प्राप्त होणाऱ्या तक्रारी निकाली काढण्यासाठी पुढीलप्रमाणे तालुकानिहाय नोडल अधिकारी व
सहायक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये तालुका नोडल अधिकारी, सहा.नोडल अधिकारी यांचे नाव व
मोबाईल क्रमांक कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.
नांदेड तालुका- तहसिलदार अरून जऱ्हाड 9511774349, सारंग चव्हाण
ना.त.पुरवठा 9822232545, 02462-236769.
अर्धापूर-तहसिलदार सुजीत नरहरे 8275273829, जाधव ना.त.
पुरवठा 9823271459 02462-272167. कंधार-तहसिलदार
सखाराम मांडवगडे 9011925584, ताडेवार ना. त. पुरवठा 9822638671, 02466-223424. लोहा- तहसिलदार
व्ही. एम. परळीकर 9049286856, राम
बोरगावकर ना.त.पुरवठा 9404465313, 02466-242460. भोकर- तहसिलदार भरत सुर्यवंशी 9623398559, के. व्हि. मस्के ना.त.पुरवठा 8390247049,
02467-222622. मुदखेड-तहसिलदार दिनेश
झांपले 9422965456, एस. जी. जोगदंड ना.त.पुरवठा
8669064978, 02462-275551. धर्माबाद-तहसिलदार शिंदे डी. एन. 9422611487, एस. एन. हांदेश्वादर ना. त. पुरवठा 9423439557,
02465-245200. उमरी- तहसिलदार एम. एन.
बोथीकर 9921844511, राजेश लांडगे ना.तह. 9049945378, 02467-244202. देगलूर-
तहसिलदार अरविंद बोळंगे 7776889999, वसंत नरवाडे ना.त.पुरवठा
9421913691, 02463-255033. मुखेड- तहसिलदार काशिनाथ पाटील 9422911933,
आर. आर. पदमवार नरवाडे ना.त.पुरवठा 8805889485, 02461-222522. बिलोली- तहसिलदार राजपुत विक्रम
महाजन 9922317071, उत्तम निलावार ना.त.पुरवठा
8208290063, 02465-223322. नायगाव- तहसिलदार श्रीमती सुरेखा नांदे 7775034666, एन. एस. भोसीकर ना.त.पुरवठा 9545929394,
02465-203592. किनवट- तहसिलदार नरेंद्र
तबाजी देशमुख 7588560342, श्री. लोखंडे ना.त.पुरवठा
9421759608, 02469-222008. माहूर- तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर 9421490400,
8668676787, गोविंदवार ना.त.पुरवठा 9423352436 02460-268521, हदगाव- तहसिलदार जीवराज डापकर 7350531111, विजय येरावाड ना.त.पुरवठा 9545009009,
02468-222328. हिमायतनगर- तहसिलदार जाधव
एन. बी. 9552972949, अनिल तामसकर ना.त.पुरवठा
9403460422, 02468-244428 याप्रमाणे आहेत.
नोडल अधिकाऱ्यांनी कार्यालयाकडून ई-मेल, दुरध्वनी, व्हॉटसअप व पत्राद्वारे
तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत स्वत: किंवा आपले
यंत्रेणेमार्फत 24 तासाच्या आत वस्तुस्थितीदर्शक चौकशी करावी. त्यानंतर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. ज्या तक्रारीमध्ये तथ्य दिसुन येत नाही, त्या तक्रारी त्वरीत निकाली काढून जिल्हाधिकारी कार्यालयास तसे अवगत करावे.
तक्रारदारांने चुकीची तक्रार केल्याचे चौकशीअंती निदर्शनास आल्यास
तक्रारदाराविरूध्द नियमानुसार फौजदारी स्वरुपाची व योग्य ती कार्यवाही करावी. या परिपत्रकात दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन
करण्यात यावे. यात हलगर्जीपणा, टाळाटाळ केल्याचे निर्दशनास
आल्यास संबंधितांविरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे परित्रकात जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.
000000
No comments:
Post a Comment