Friday, April 24, 2020


अन्न-आस्थापना दुकानांच्या केल्या 298 तपासण्या
सुचनांचे पालन करण्याचे अन्न औषध प्रशासनचे आवाहन   
नांदेड, दि. 24 (जिमाका) :- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्न आस्थापना दुकानांच्या तपासण्या करण्यात येत असून अन्न व औषध प्रशासन नांदेड कार्यालयाच्या अखत्यारीतील नांदेड शहर, अर्धापुर व मुदखेड येथील किराणा, प्रोविजन स्टोअर्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, ऑईल शोरुम व जीवनावश्यक वस्तू उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्री दुकाने यांच्या 298 तपासण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी पेढीतील कामगारांना, पेढीमालकांना मास्क व सॅनिटायझर्सचा वापर करण्याबाबत सुचित करण्यात आले.
शासनस्तरावर विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. अन्न व औषध प्रशासन नांदेड या कार्यालयाच्यावतीने सुध्दा विविध उपाय योजना राबविल्या जात असून त्याचाच भाग म्हणुन
किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक पुरवठा ग्राहकांना व्हावा याबाबत देखील प्रशासनाकडून सर्व पेढीधारकांना यथायोग्य सुचना देण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणी अन्न आस्थापनाधारक यांच्या बैठका घेऊन जीवनावश्यक वस्तुंचा काळा बाजार, साठेबाजी, प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करू नये, सामाजीक अंतर राखणे आणि जमावबंदी कलम 144 चे काटेकोर पालन करावे अन्यथा कठोर कार्यवाहीस सामोर जावे लागेल याबाबत निदर्शीत करण्यात आले आहे. सर्व अन्न आस्थापनाधारकांना देण्यात आलेल्या सुचनांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...