वृत्त क्र. 578
एक रुपयात पीक विमा योजना
वृत्त क्र. 578
एक रुपयात पीक विमा योजना
महाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार
· कृषी मंत्री धनंजय मुंडे पुरस्कार सोहळ्यात उपस्थित
· 15 व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार
नवी दिल्ली, 11 : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार काल नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
15 व्या कृषी नेतृत्व समितीच्या- 2024 काँनक्लेव्हचे ॲग्रीकल्चर टुडे समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल दखल घेत महाराष्ट्राची सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, ॲग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ. एम.जे. खान, राज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कृषी विकासाच्या विविध योजना आणि शाश्वत विकासासाठीच्या प्रयत्नांची यावेळी माहिती दिली. श्री.शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हे कृषी क्रांतीचे जनक राज्य आहे. महाराष्ट्राला हरित क्रांतीची समृद्ध परंपरा असून कृषी व शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची गौरवशाली परंपरा आहे. राज्याचा प्रमुख म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे. मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो असून हा पुरस्कार स्वीकारताना मला मोठा अभिमान वाटतो. महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याच्या रूपात निवडल्याबद्दल 'ॲग्रीकल्चर टुडे' आणि परीक्षक मंडळाचे आभार मानले, महाराष्ट्राला मिळालेला पुरस्कार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान आहे. शेतकऱ्यांचे कष्ट, मेहनत आणि मातीच्या प्रेमाची ही फलश्रुती आहे. आमच्या शेतकऱ्यांना 'अन्नदाता' म्हणून मान दिला जातो आणि राज्य सरकारने त्यांच्या हितांसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास उत्सुक असून राज्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो, जेणेकरून अधिकाधिक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. बदलत्या काळानुसार आणि हवामानातील बदल पाहता, आमचा शेतकरी सदैव जागरूक आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र कृषी क्रांतीत अग्रेसर असल्याची माहिती श्री.शिंदे यांनी यावेळी दिली.
युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी तापमान वाढीचे युग संपले असून, होरपळीचे युग सुरु झाल्याचे आणि तातडीच्या प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्राने या आव्हानाला प्रतिसाद देत 21 लाख हेक्टरवर झाडे लावण्याचा आणि 5 टक्के बायोमास वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने जगातील मानव जात वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राज्य शासनाने बांबू मिशनला प्राधान्य दिले असून, बांबू ही विशेष वनस्पती असल्याचे सांगत, बांबू पासून 2000 प्रकारच्या वस्तू तयार होत आहेत. 'बांबू घास नही खास है' असे म्हणत बांबूमुळे पर्यावरण संवर्धन आणि अन्न सुरक्षा यावरही भर दिला जात असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सहकार्य केलं आहे. तसेच, पीक विमा योजनेत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. लातूर जिल्ह्यात देशातील पहिला मायक्रो मिलेट क्लस्टर सुरू केला आहे आणि सिंचन प्रकल्पांद्वारे 17 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचा ध्येय निश्चित केले आहे.राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं ठरवले आहे आणि कपास व सोयाबीन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. राज्यातील कृषी क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये मायक्रो मिलेटचे उत्पादन वाढ, पीएम किसान सन्मान निधी दुप्पट, नॅनो-तंत्रज्ञान खतांचे वितरण, तृणधान्यांना एमएसपी, हरित पट्टा निर्माण आणि सिंचन क्षमता वाढ यांचा समावेश आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतूक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाकडून हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सुमारे 10 लाख हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड करण्यात येत आहे. या क्रांतिकारी निर्णयाचे केंद्रीय कृषिमंत्री श्री. चौहान यांनी कौतुक केले.
००००

वृत्त क्र. 577
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 10 जुलै :- जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील 670 रिक्त पदाच्या फेरपरीक्षेकरिता, परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. ही परीक्षा नांदेड जिल्ह्यात आयन डिजिटल झोन आयडीझेड, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी गेट क्रमांक 18 आणि 22 नांदेड या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी
अभिजीत राऊत यांनी सदर
परीक्षा केद्रापासून 100 मीटरच्या परिसरात, दि. 14, 15 व 16 जुलै 2024 रोजी सकाळी 7 ते रात्री
9 वाजेपर्यतच्या कालावधीत, परीक्षार्थी व
परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरीक्त इतर
कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळेत परीक्षा
केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,एस.टी.डी.,
आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स,झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास
याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
0000
वृत्त क्र. 576
कंधार शहरात 16 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही
नांदेड, दि. 10 जुलै :- कंधार शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 9 जुलै रोजी कंधार शहरात अचानकधाडी टाकून एकूण 16 तंबाखू विक्रेत्यांकडून 8 हजार 400 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजु टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, दंत शल्यचिकित्सक डॉ. महेश पोकळे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक अरविंद वाटोरे व केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड तसेच कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख व पोलीस नाईक प्रकाश टाकरस उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक
अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व
तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू
नियंत्रण कक्ष, जिल्हा
रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 575
माजी सैनिकांनी नाहरकत प्रमाणपत्रासाठी 11 जुलै पर्यंत संपर्क साधावा
नांदेड, दि. 10 जुलै :- सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांच्याद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट क च्या रिक्त पदांसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे त्या माजी सैनिकांनी नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी 11 जुलै पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कल्याण संघटक
मोबाईल नं. 8380873985, 8707608283 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा
सैनिक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
0000
वृत्त क्र. 574
88 वर्षापेक्षा वय जास्त असणाऱ्या
सैनिकांनी संपर्क साधावा
नांदेड, दि. 10 जुलै :- नांदेड जिल्ह्यातील ज्या सैनिकांचे वय 88 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी योग्य कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये नोंद करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
नांदेड तहसिल कार्यालयाच्या आवारात
असणाऱ्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये ज्या माजी सैनिकांचे वय 88 वर्षापेक्षा
जास्त आहे त्यांनी आणि जर त्यांची प्रकृती ठिक नसेल तर त्यांच्या नातेवाईक किंवा वारसाने
कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कार्यालयात 12 जुलै पर्यंत नोंद करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी
माजी सैनिक कल्याण समन्वयक मोबाईल नं. 8380873985, 8707608283 या क्रमांकावर संपर्क
साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
0000
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...