Tuesday, June 20, 2023

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धा

 

नांदेड (जिमाका) 20 :- राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “राजर्षी शाहु महाराजांचा सामाजिक समता दृष्टीकोण” निबंध व "सामाजिक समता आणि वैज्ञानिक प्रगती" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शुक्रवार 23 जून 2023 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र घेऊन जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.  

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त शुक्रवार 23 जून रोजी सकाळी 11 वा. जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निबंध स्पर्धेचा विषय "राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक समता दृष्टीकोण" असून निबंध 1 हजार 500 शब्दात लिहिणे आवश्यक आहे. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येईल. ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे त्यांनी 23 जून रोजी सकाळी 11 वा. जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे उपस्थित रहावे. तसेच 23 जून रोजी दुपारी 2 वा. "सामाजिक समता आणि वैज्ञानिक प्रगती" या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेत सर्व महाविद्यालयीन मुला-मुलींना भाग घेता येईल. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  

000000

 राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाच्या

कर्ज योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) 20 :- राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली (एनएसटीएफडीसी नवी दिल्ली) यांच्याकडे विविध योजनांचा / व्यवसायांचा सन 2023-24 करीता कर्ज प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. त्याअनुषंगाने शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. यांना दिलेल्या लक्षांक / उद्दिष्टांप्रमाणे त्यांच्या कार्यक्षेत्रातील कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या योग्य व पात्र लाभार्थ्यांची निवड करून मुल्यमापन समितीचे शिफारशीसह परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 15जुलै 2023 पर्यंत मुख्य कार्यालयास सादर करावा.

 

सहपत्र (लक्षांक / उद्दिष्ट) बाबत शाखा व्यवस्थापकांनी आपल्या कार्यक्षेत्रात लक्षांक पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. तसेच कोणाच्याही दबावाखाली न येता खरोखरच ज्या व्यवसायाची आवश्यकता आहे, व जे लाभार्थी व्यवसाय करण्यास इच्छूक आहे व परतफेड करतील अशा लाभार्थ्यांचा प्रस्ताव सादर करावा. मात्र कुठेही व्यवसाय न करता निधी मिळवणे अशी मानसिकता दिसल्यास तसे प्रस्ताव सादर करू नयेत. आपल्याकडील परिपूर्ण कर्ज प्रस्ताव मुख्य कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर एनएसटीएफडीसी नवी दिल्ली यांच्याकडे निधी मागणी करीता प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याने सदरकामी कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

 

हे लक्षांक पुर्ण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना पुढीलप्रामणे आहेत. एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज योजनेअंतर्गत कृषी आणि संलग्न व्यवसाय (रुपये 2 लक्ष) व लघु उद्योग व्यवसाय (रुपये 3 लक्ष) अंतर्गत लाभार्थी निवड करतांना www.nstfdc.tribal.gov.in या संकेतस्थळावरील व्यवसायाच्या यादीच्या अनुषंगानेच आपल्या कार्यक्षेत्रातील वाव असणारे व्यवसायाभिमुख योजनेच्या लाभार्थ्यांचे कर्ज मंजुरी प्रस्ताव सादर करण्याची दक्षता घ्यावी. (www.nstfdc.tribal.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Help Zone यावर क्लिक केल्यानंतर Indicative Schemes मधील व्यवसायाची यादी.)

 

आपणाकडे प्राप्त झालेले लाभार्थ्यांचे कर्ज मागणी प्रस्ताव, आपणास देण्यात आलेल्या लक्षांकानुसार मूल्यमापन समितीसमोर ठेवून समितीच्या शिफारशीसह मुख्य कार्यालयाकडे तात्काळ मंजुरीस पाठविण्यात यावे. कर्ज वाटप करतांना प्राप्त अर्जांची छाननी करून कर्जाची परतफेड करू शकणाऱ्या योग्य व पात्र लाभार्थी निवड करण्याची तसेच आवश्यक कागदपत्रांची व करारनाम्याची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधीत शाखा व्यवस्थापक यांची राहील. मुख्य कार्यालय नाशिक स्तरावर योजना निहाय नस्ती ठेवण्यात येत असल्यामुळे या कर्ज योजनांच्या मूल्यमापन समितीच्या शिफारशीसह योजनानिहाय प्रस्ताव पाठविण्यात यावेत.

 

एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज योजना राबविण्याची तसेच कर्ज वितरणाची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाखा कार्यालयाची राहील व यास संबंधित शाखा व्यवस्थापक जबाबदार राहतील. मुख्य कार्यालयाकडून कर्ज प्रकरण मंजुरी दिल्यानंतर व तसे आदेश प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांचा सहभाग, वाढीव सहभाग रक्कम लाभार्थ्यांकडून शाखा कार्यालयास जमा करून कर्ज वितरणाची कार्यवाही करण्यात यावी.

 

किनवट शाखा कार्यालयाअंतर्गत महिला सबलीकरण योजना (रु.2 लक्ष)-8, बचतगट योजना (रु. 5 लक्ष)-1, कृषी आणि संलग्न व्यवसाय (रु.2 लक्ष)-11, हॉटेल ढाबा व्यवसाय (रु.5 लक्ष)-3, स्पेअर पार्ट / गॅरेज / ऑटो वर्कशॉप (रु.5 लक्ष)-2, वाहन व्यवसाय (रु.10 लक्ष पर्यंत)-1, लघु उद्योग व्यवसाय (रु.3 लक्ष)-1 याप्रमाणे एकुण 27 लक्षांक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक यांनी दिले आहे.  

00000

 कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा नांदेड दौरा  

नांदेड (जिमाका) दि. 20 :- राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

 

बुधवार 21 जून 2023 रोजी मुंबई येथुन नंदिग्राम एक्सप्रेस रेल्वेने सकाळी 5 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन. सकाळी 5.15 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. नांदेड येथे शनिवार 24 जून 2023 रोजी होणाऱ्या “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी बैठकीस उपस्थिती. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.

00000 

Monday, June 19, 2023

 नांदेड-भोकर रोडवर सिताखंडी मोड येथे अपघातात 4 मृत्यू 

·  लगेच माहिती मिळाल्याने जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ जखमींवर उपचार

 

 नांदेड (जिमाका) दि. 19 :-  नांदेड-भोकर रोडवर सिताखंडी मोड येथे आज दुपारी 3.50 च्या सुमारास हा अपघात झाला.  टेम्पो (407) व  टाटा मॅजिक यांच्यात समोरासमोर हा अपघात झाला. ग्रामीण रुग्णालय भोकरच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका अन्य रुग्णाला नांदेडकडे घेऊन येत असतांना या रुग्णवाहिकेसमोरच सदर अपघात घडल्याने अती गंभीर 4 रुग्णांना नांदेड येथे तातडीने हालवणे सोपे झाले. या अपघातात जागेवरच 4 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पाठविण्यात आले. इतर चार जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी तातडीने भोकर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात घडल्याबरोबर याची माहिती तातडीने शासकीय रुग्णालय व प्रादेशिक परिवहन विभागाला कळल्यामुळे प्रशासनाला तात्काळ पुढील व्यवस्था करणे शक्य झाले. भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेणाऱ्या चार रुग्णांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे हालविण्यात आले आहे.

00000

 योजनांविषयक सर्वसामान्यांची साक्षरताही आवश्यक

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 
▪️डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतला विभागनिहाय आढावा
नांदेड (जिमाका) 19 :- लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत ज्यांच्यासाठी योजना आखल्या जातात त्या योजनांबाबतची माहिती, साक्षरता लाभार्थ्यांना देणे अत्यावश्यक असते. त्यादृष्टिने शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी केले जाणारे कागदावरचे नियोजन आता जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी प्रत्यक्षात उतरून योजनांबाबतचा आत्मविश्वास लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास कटिबद्ध व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या प्रस्तावित भव्य कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले सर्व विभाग प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती.
सर्वसामान्यांच्या विकासाची संकल्पना राबवितांना अप्रत्यक्षपणे योजनेला मूर्त स्वरूप हे सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे लाभधारक देत असतात. त्यांच्या मनातील विश्वास वाढावा, शासकीय योजनांचे प्रतिबिंब त्यांच्या विकासात उमटावे, योजनांच्या उद्दीष्टाप्रती त्यांच्या मनात सजगता निर्माण व्हावी या उद्देशाने शासन आपल्या दारी हे अभियान महत्वाचे आहे. यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख गजानन पाटील यांनी उपक्रमाबाबत व नियोजनाबाबत अमूल्य सूचना केल्या.
0000




 मोफत तायक्वांदो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड व तायक्वांदो असोसिएशन ऑफ नांदेडच्यावतीने 28 जून 2023 पर्यत  मोफत तायक्वांदो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल समिती, वसतीगृह इमारत येथे करण्यात आले आहे. सायं 5.30 ते 7 या कालावधीत आयोजित शिबिराचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

 

या शिबीरात स्वसंरक्षणाचे, फिटनेस, स्ट्रेन्थ, कंडीशनीग, स्पर्धापूर्व तयारीबाबतचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर बालाजी पाटील जोगदंड, एन आय एस प्रशिक्षक ओमप्रकाश आळणे हे प्रशिक्षण देणार आहे. यात सहभागी गरीब व होतकरू पाच तायक्वांदो पटूना जिल्हा संघटनेच्यावतीने दत्तक घेणार असल्याचे बालाजी पाटील जोगदंड यांनी सांगीतले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषता महिला व मुलींनी लाभ घ्यावा असे संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य, सुभाष डाकोरे पाटील, अभिजीत ( मुन्ना ) कदम, तायक्वांदो पालक समितीचे अध्यक्ष राजेद्र सुगावकर, संतोष कनकावार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 देहदान सर्वश्रेष्ठ दान

मुलीने केले आईचे देहदान

                                               

नांदेड (जिमाका) दि. 19 :- मृत्यूनंतर देह हा जाळून, पुरुन नष्ट होण्यापेक्षा तो शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करून देणे हे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य आहे. यासाठी नागरिकांनी देहदानाच्या चळवळीत सहभाग घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी केले आहे.

 

असाच दृष्टीकोन समोर ठेवून किनवट तालुक्यातील बोधडी बु. येथील सविता माधव श्रीरामवार वय 58 वर्ष यांचा मृत्यूपश्चात देह  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागात दान केला आहे.  अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे प्रशस्तीपत्र देऊन आभार व्यक्त केले. यावेळेस डॉ.अनुजा देशमुख, डॉ.अनिस रहेमान तसेच डॉ.इनामदार (जनऔषधी विभाग), नियोजन अधिकारी डोळे हे उपस्थित होते. डॉ.अनुजा देशमुख आणि डॉ. रहेमान तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील संपूर्ण टीमने देहदानासाठी परिश्रम घेतले.

 

सविता माधव श्रीरामवर यांची देहदान करण्याची इच्छा होती ती त्यांची कन्या रुपाली माधव श्रीरामवार यांनी पुढे येऊन पूर्ण केली.  त्या एक आशा वर्कर सुपरवायझर आहेत आणि त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोविडच्या कठीण काळात शरीररचनाशास्त्र विभागात मृतदेह हा स्वीकारता येत नव्हता. त्या कारणाने विभागात मृतदेहाची कमतरता भासत होती.  कोविड नंतर देहदाना प्रती जनजागृती निर्माण होऊन बरेचजण आता पुढे येत आहेत. त्यामुळे ही पोकळी भरुन येत आहे. आणि याचा शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यात खुप मोठा हातभार लागत आहे. समाजातील लोकांनी सविता माधव श्रीरामवार यांचा आदर्श समोर ठेवून देहदानाच्या चळवळीत सहभाग घ्यावा, असे अधिष्ठाता डॉ.वाकोडे यांनी कळविले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...