Monday, June 19, 2023

 मोफत तायक्वांदो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड व तायक्वांदो असोसिएशन ऑफ नांदेडच्यावतीने 28 जून 2023 पर्यत  मोफत तायक्वांदो प्रशिक्षण शिबीराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल समिती, वसतीगृह इमारत येथे करण्यात आले आहे. सायं 5.30 ते 7 या कालावधीत आयोजित शिबिराचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

 

या शिबीरात स्वसंरक्षणाचेफिटनेसस्ट्रेन्थकंडीशनीगस्पर्धापूर्व तयारीबाबतचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर बालाजी पाटील जोगदंडएन आय एस प्रशिक्षक ओमप्रकाश आळणे हे प्रशिक्षण देणार आहे. यात सहभागी गरीब व होतकरू पाच तायक्वांदो पटूना जिल्हा संघटनेच्यावतीने दत्तक घेणार असल्याचे बालाजी पाटील जोगदंड यांनी सांगीतले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषता महिला व मुलींनी लाभ घ्यावा असे संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. हंसराज वैद्यसुभाष डाकोरे पाटीलअभिजीत ( मुन्ना ) कदमतायक्वांदो पालक समितीचे अध्यक्ष राजेद्र सुगावकरसंतोष कनकावार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...